जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अस्तरीकरणाला विरोध,शेतकऱ्यांनी थोपटले दंड!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 
  गोदावरी कालव्यांचा वहनव्यय मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने संतापलेल्या कोपरगाव तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी उजव्या कालव्याला सिमेंटकाँक्रीट अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९ वाजता एक बैठक मेंढी-वडांगळी रोड,गोदावरी उजवा कालवा पुल येथे आयोजित केली असून याकडे नगर नाशिक जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पारंपरिक इंग्रजकालीन गोदावरी कालव्यांचे छायाचित्र.

“गोदावरी कालव्याला अस्तरीकरण झाल्यामुळे पाण्याचा पाझर बंद होऊन गोदावरी कालव्यालगतचे भूजल स्रोत आटणार आहेत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार येऊन शेती व्यवसाय उध्वस्त होणार आहे”-सोमनाथ चांदगुडे,कार्यकर्ते,कालवा प्लॅस्टर विरोधी कृती समिती,गोदावरी उजवा कालवा.

   कालव्याचे अस्तरीकरण करणे हा जलसंपदा विभागाच्या पायाभूत सुविधांचा आणि पाणी बचतीचा एक भाग मानला जातो.ज्या ठिकाणी कालव्यांचा किमान वहनव्यय आहे.त्याठिकाणी अस्तरीकरण करणे बंधनकारक केले आहे.या अस्तरीकरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवल्यास महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या कलम ९३ अन्वये कायदेशीर कारवाई होऊ शकते.शिवाय अस्तरीकरणामुळे ६०% ते ८०% पाणी गळती थांबणे आवश्यक मानले आहे.राज्यात गोदावरी प्रवरा कालवे वगळता सर्वत्र अस्तरीकरण झालेले आहे.मात्र येथील पुढाऱ्यांनी याबाबत जनजागृती केली नाही परिणामी शेतकऱ्यांना मुक्त व प्रवाही सिंचन करण्याची सवय लागून गेली आहे.त्यातच दारणा धरणासह नाशिक जिल्ह्यातील धरणे शेती सिंचनासाठी इंग्रजांनी बांधलेली आहे.मात्र स्वातंत्र्यानंतर आमच्या काळया इंग्रजांनी शेती सिंचनाचे पाणी उद्योग आणि महापालिकांना मुक्तहस्ते वाटून दिले असून शेतकऱ्यांना भिकेला लावले आहे.ते कमी की काय पी.व्ही.सी.पाइपाचा शोध लागल्यापासून कालव्यांच्या वरील भागात जवळपास ५-६ कि.मी.पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेती सिंचनासाठी कालव्यांचे पाणी उडवले आहे.मात्र कोणत्याही मंत्री आणि सरकारला ते अधिकृत करावे वाटले नाही.परिणामी कालवा वहनव्ययाच्या नावाखाली कालव्यांच्या पाण्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे.त्याचे अर्थपूर्ण राजकारण प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेच्या सोयीचे असल्याने त्याबाबत कोणीही तोंड उघडायला तयार नाही.त्यात मोठे अर्थकारण मंत्री पातळीपर्यंत सुरू आहे.ही बाब आता लपून राहिलेली नाही.मागील वर्षी आमच्या प्रतिनिधीने याबाबत आमचे ‘ न्यूजसेवा ‘ वेब पोर्टलवर एक वृत्त छापून अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या डोंगळ्याचे दर तपशीलवार प्रसिद्ध केले होते.त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखले होते.तर काही पोटभरू शेतकरी नेत्यांनी बातम्या देऊन ‘पीछे मूड ‘ करून आपली योग्यता (?) दाखवून दिली होती.त्यानंतर याबाबत पहिल्यांदा शेतकऱ्यांनी हा आवाज उठवला असल्याचे मानले जात आहे.

 

“गोदावरी उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात नाशिक व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदार तसेच निफाड,सिन्नर कोपरगाव,राहाता आणि श्रीरामपूर असे पाच आमदार आहेत.मात्र हे सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री किंवा जलसंपदा मंत्री यांच्याकडे एकत्रित जाऊन कालव्याच्या अस्तरीकरणास विरोध करू शकत नाहीत हे वास्तव आहे”-कालवा प्लॅस्टर विरोधी कृती समिती,गोदावरी उजवा कालवा.

    दरम्यान यापूर्वी दि.१७ आक्टोबर २०२६  रोजी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चारी
क्र.०१ चे गेटजवळ गोदावरी कालव्याला होणारे सिमेंट अस्तरीकरणाचे काम बंद पाडलेले होते.मात्र त्यानंतरही जलसंपदा विभाग थांबायला तयार नाही असे दिसून येत आहे.परिणामी शेतकऱ्यांत या बाबत असंतोष खदखदत असल्याचे दिसून येत आहे.गोदावरी उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात नाशिक व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदार तसेच निफाड,सिन्नर कोपरगाव,राहाता आणि श्रीरामपूर असे पाच आमदार आहेत.मात्र हे सर्व लोकप्रतिनिधी जलसंपदा मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याकडे एकत्रित जाऊन कालव्याच्या अस्तरीकरणास विरोध करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.म्हणूनच सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनआदींना जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे बनले आहे.म्हणूनच अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे. या बैठकीस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close