गुन्हे विषयक
गोवंश हत्या प्रकरणी दोन विविध गुन्हे दाखल ?

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आज सकाळी 830 वाजेच्या सुमारास खडकी नाका,निवारा कॉर्नर या ठिकाणी अवैधरित्या गोवंश जातीचे तीन जनावरे आपल्या महिंद्रा पिकप (क्रमांक एम.एच.15 ई.जी.8928) या वाहनातून घेऊन जाताना शहर पोलिसांनी सदर वाहनासह 4.60 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यातील आरोपी दत्तू मच्छिंद्र फड आणि ईसा इसुक कुरेशी रा.सुराळा तालुका वैजापूर यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात येवला तालुक्यातील बदापूर शिवारात कोपरगावातील आरोपी अल्ताफ करीम कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे त्यावर भाजप नेते कोणती कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

येवला तालुक्यातील बदापूर शिवारात आणखी एक गोवंश हत्येची घटना उघडकीस आली असून त्यात सत्ताधारी भाजप (ईशान्य गडाचा लाडका कार्यकर्ता/ ) कोल्हे गटाच्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याने आपल्या होंडा ॲक्टिव्हा गाडीचे डिकीतून अवैध गोवंश घेऊन जात असताना त्याला गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने अटक केली असून त्याचे नाव अल्ताफ करीम कुरेशी असल्याची माहिती येवला शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्याचे हात गोवंश हत्येने रंगले असल्याचे भाजपचे बेगडी प्रेम उघड झाले आहे.
राज्यात वाढती गोवंश हत्या ही खरोखरच एक अत्यंत चिंताजनक आणि गंभीर समस्या आहे.भारताच्या सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक संरचनेत गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे गोवंश हत्येचे प्रमाण वाढणे हे केवळ धार्मिक भावनांशी जोडलेले नसून त्याचे अनेक दूरगामी परिणाम आपल्या संपूर्ण व्यवस्थेवर होत आहेत.भारतीय शेती आजही मोठ्या प्रमाणावर बैलांवर आणि सेंद्रिय खतांवर अवलंबून आहे.गोवंश घटल्यास शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक खतांवर आणि ट्रॅक्टरवर अवलंबून राहावे लागेल,ज्यामुळे शेतीचा खर्च वाढेल.गोवंश हत्येमुळे दुधाळ जनावरांची संख्या कमी होऊन दुधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो,ज्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या आणि सर्वसामान्यांच्या पोषणावर होतो.गाईचे शेण आणि गोमूत्र हे नैसर्गिक खतांचे आणि कीटकनाशकांचे मुख्य स्त्रोत आहेत.गोवंश नष्ट झाल्यास सेंद्रिय शेतीची संकल्पना धोक्यात येईल.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी नापीक होत आहेत.गोवंशाचे रक्षण केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.मात्र काही असामाजिक तत्व ही गोवंश हत्या करण्याचे थांबताना दिसतं नाही.परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.कोपरगाव शहरात आज सकाळी 8.30 वाजता पोलिसांना एक गुप्त खबरी मार्फत सूचना मिळाली की,कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर,टाकळी नाका या ठिकाणी वरील क्रमांकाचा एक महिंद्रा पिकप टेम्पो आपल्या वाहनातून अवैधरित्या तीन गोवंश जातीचे जनावरे घेऊन जात आहे.त्यामुळे त्या खोबरीनुसार पोलिसांनी आपला सापळा रचला असता त्यात वरील आरोपी दत्तू मच्छिंद्र फड आणि ईसा इसुक कुरेशी रा.सुराळा ता.वैजापूर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे त्यात अलगतपणे अडकले असून त्याचे विरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 563/2026 प्राणी संरक्षण अधिनियम 5 अ (1)(9),प्राणी छळ प्रतिबंधक कलम 311(1) जी,त्यासह भारतीय न्याय संहिता कायदा कलम 5 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाकाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहेत.

दरम्यान येवला तालुक्यात बदापूर शिवारात आणखी एक गोवंश हत्येची घटना उघडकीस आली असून त्यात सत्ताधारी भाजप (ईशान्य गडाचा लाडका कार्यकर्ता/ ) कोल्हे गटाच्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याने आपल्या होंडा ॲक्टिव्हा गाडीचे (क्रमांक एम.एच.17 डी.जी.2090) डिकीतून अवैध गोवंश घेऊन जात असताना त्याला गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने अटक केली असून त्याचे नाव अल्ताफ करीम कुरेशी असल्याची माहिती येवला शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्याचे हात गोवंश हत्येने रंगले असल्याचे भाजपचे बेगडी प्रेम उघड झाले आहे त्यामुळे वरिष्ठ नेते काय कारवाई करणार याकडे तालुक्यात लक्ष लागून राहिले आहे.



