जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

बस विना विद्यार्थ्यांचे हाल,मोठे शैक्षणिक नुकसान ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
 
  कोपरगाव तालुक्यातील येवला मार्गावर असलेल्या नाटेगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आणि अन्य आगाराच्या बस पिंपळगाव पाटी येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून शैक्षणिक नुकसान होत असल्याने कोपरगाव येथील आगार व्यवस्थापकांनी याची दखल घेऊन तातडीने सकाळी 11 ते सायंकाळी 05 वाजेच्या सुमारास वाढीव बस सुरू करावी अशी मागणी नाटेगाव ग्रामपंचायतीने केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड मार्गावर असलेल्या पिंपळगाव पाटी याठिकाणी जाण्यासाठी नाटेगाव फाटा असून येथून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कोपरगाव येथील विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात.मात्र त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी पुरेशा बस उपलब्ध नाही यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत नाटेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव 03 ऑगस्ट 2026 रोजी करून ते संबंधित कोपरगाव आगार व्यवस्थापक यांना पाठवला आहे.मात्र त्यांनी त्याची अद्याप दखल घेतली असल्याचे दिसून आलेले नाही.त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांत अच्छा-खाँसा संताप आहे.

   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि ताफा मजबूत करण्यासाठी ५ हजार नवीन बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे.टाटा मोटर्सने निविदेत सर्वात कमी दर सादर केला असून,लवकरच ५ हजार नव्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सूरु आहे.३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने २०३७ पर्यंत एस.टी.चा संपूर्ण ताफा १०० टक्के प्रदूषणमुक्त आणि इलेक्ट्रिक (ई-बस) करण्याचे धोरण आखले ही चांगली बाब आहे.नवीन बस आल्यानंतर ग्रामीण भागातील रद्द होणाऱ्या फेऱ्या सुरळीत होऊन ‘मागेल त्याला बसफेरी’ देण्याचा प्रयत्न असणार असल्याची राणा भीमदेवी घोषणा परिवहन मंडळाच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली आहे.मात्र अद्याप त्यावर कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही.परिणामी त्याची किंमत नागरिकांना आणि प्रवाशांना विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चुकवावी लागत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड मार्गावर असलेल्या पिंपळगाव पाटी याठिकाणी जाण्यासाठी नाटेगाव फाटा असून येथून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कोपरगाव येथील विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात.मात्र त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी पुरेशा बस उपलब्ध नाही यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत नाटेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव 03 ऑगस्ट 2026 रोजी करून ते संबंधित कोपरगाव आगार व्यवस्थापक यांना पाठवला आहे.मात्र त्यांनी त्याची अद्याप दखल घेतली असल्याचे दिसून आलेले नाही.त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांत अच्छा-खाँसा संताप आहे.त्यामुळे या मार्गावर नवीन बस सुरू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नानासाहेब मोरे,खंडू मोरे,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पालकांनी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close