जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन गटात मारहाण,पोलिसांत दोघांवर गुन्हा,एक गंभीर जखमी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे राजकीय वातावरण तापत चालले असून कुरघोड्यांचे राजकारणास ऊत येत चालला आहे.कोपरगाव तालुका याला अपवाद नाही.तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव रोडवर नुकतीच दोन गटात,” तू,मला हाड का म्हणाला” या कारणावरून चांगलीच मारहाण झाली असून यातील फिर्यादीचा भाऊ माधव दगडू सांगळे यांनी विनोद दगडू सांगळे (वय-44 ) या आपल्या भावाला लोखंडी रॉड,दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा दाखल केल्याने सोनारी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

सोनारी येथील हाणामारीत जखमी विनोद सांगळे हे दिसत आहे.

कोपरगाव तालुक्यातील काळे,कोल्हे दोन्ही आमदार आणि संगमनेर येथील आ.सत्यजीत तांबे हेही विधानभवनात गत महिन्यात एकत्र येऊन हास्य विनोद करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले असताना स्थानिक गट आणि तटात विभागलेले कार्यकर्ते कोणताही बोध घेण्याचे स्थितीत आढळून येत नाही परिणामी त्यांच्यात किरकोळ कारणावरून लांडगेतोड सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे.त्यातून एकमेकाचे जीवावर उठण्याचे त्यांचे प्रताप सुरू असल्याचे दिसून येत आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही आठवड्यावर येऊन ठेवल्या आहेत.त्यामुळे या गटांचे राजकीय हेवेदावे अधिकच टोकदार आणि धारदार होताना दिसून येत आहे.त्याची प्रचिती नुकतीच सोनारी येथे आली आहे.

      अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकारणातील पारंपरिक व कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी खा.सुजय विखे आणि विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते संगमनेर येथे एकाच मंचावर एकत्र आले आहेत.तर दुसरीकडे कोपरगाव तालुक्यातील काळे,कोल्हे दोन्ही आमदार आणि संगमनेर येथील आ.सत्यजीत तांबे हेही विधानभवनात गत महिन्यात एकत्र येऊन हास्य विनोद करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले असताना स्थानिक गट आणि तटात विभागलेले कार्यकर्ते कोणताही बोध घेण्याचे स्थितीत आढळून येत नाही परिणामी त्यांच्यात किरकोळ कारणावरून लांडगेतोड सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे.त्यातून एकमेकाचे जीवावर उठण्याचे त्यांचे प्रताप सुरू असल्याचे दिसून येत आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही आठवड्यावर येऊन ठेवल्या आहेत.त्यामुळे या गटांचे राजकीय हेवेदावे अधिकच टोकदार आणि धारदार होताना दिसून येत आहे.त्यातून हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत.याची ताजी चुणूक सोनारी ग्रामपंचायत हद्दीत पाहायला मिळाली आहे.

 

“फिर्यादी माधव सांगळे याचा भाऊ विनोद सांगळे याने विकासाची स्पर्धा करण्याचे सोडून वारंवार आमचा मुलगा शुभम सांगळे याला जाता येता गावात विकास झाल्याने व आगामी ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचे राजकीय वैमनस्य मनात धरून पाहून जाता येताना कायम आसपास कोणतेही कुत्रे किंवा त्या सदृश प्राणी नसताना त्यास खिजवण्याच्या दृष्टीने,” हाड” म्हणून खिजवत होता.त्याने वारंवार सहन करूनही त्याने आपली कृती सोडली नव्हती.परवा दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता त्याने बाजार समितीत कामावर जाताना तिचं कृती केल्याने नको असताना हा दुर्दैवी प्रकार घडला आहे”- बद्रीनाथ सांगळे,माजी सरपंच,सोनारी ग्रामपंचायत,तालुका कोपरगाव.

    यातील फिर्यादी माधव दगडू सांगळे यांच्या म्हणण्यानुसार दि.29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8.30 वा चे सुमारास सोनारी ते धारणगाव रोडवर येथील मावळत्या महिला सरपंच शालिनी सांगळे व माजी सरपंच बद्रीनाथ सांगळे यांचा मुलगा शुभम बद्रिनाथ सांगळे याने माझा भाऊ विनोद सांगळे यास तो आपल्या दुचाकीवरून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मापारी म्हणून कामाला जात असताना त्याला रस्त्यात अडवुन,”मला पाहुन तु हाड का म्हणाला” असे म्हणुन लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर मारहाण केली होती.त्यानंतर पुन्हा एकदा तो सोनारी गावात आला असता शुभम बद्रिनाथ सांगळे व अभिजीत बद्रिनाथ सांगळे या भावांनी त्यास त्याच कारणावरून लोखंडी रॉडने दगडाने व लाथाबुक्काने मारहाण करुन शिविगाळ करून गंभीर जखमी केले व आमचे नादी लागला तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.

   दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत आ.विवेक कोल्हे गटाचे माजी सरपंच बद्रीनाथ सांगळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,फिर्यादी माधव सांगळे याचा भाऊ विनोद सांगळे याने वारंवार आमचा मुलगा शुभम सांगळे याला जाता येता ग्रामपंचायत राजकारणाचे राजकीय वैमनस्य मनात धरून पाहून जाता येताना कायम आसपास कोणतेही कुत्रे किंवा त्या सदृश प्राणी नसताना त्यास खिजवण्याच्या दृष्टीने,” हाड” म्हणून खिजवत होता.त्याने वारंवार सहन करूनही त्याने आपली कृती सोडली नव्हती.परवा दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता त्याने बाजार समितीत कामावर जाताना तिचं कृती केल्याने ही प्रकार घडला असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.त्यांच्या वादात त्यानंतर फिर्यादीचा माझा भाऊ विनोद सांगळे हा गावात आला असता त्यावर प्रतिहल्ला झाला असता त्याला वाचविण्यासाठी अभिजीत सांगळे हा मध्ये आला असता पुन्हा ही हाणामारी झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.यावरून फिर्यादीचा भाऊ माधव सांगळे याने शुभम बद्रिनाथ सांगळे व अभिजीत बद्रिनाथ सांगळे यांचेवर लोखंडी रॉडने दगडाने व लाथाबुक्काने मारहाण करुन शिविगाळ करून किरकोळ गंभीर जखमी केले असल्याचे घटनेस दुजोरा दिला आहे.मात्र फिर्यादी माधव सांगळे यांचे म्हणण्यानुसार त्याचे डोक्याला गंभीर दुखापत करण्यात आली असून तो अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान यातील जखमी विनोद सांगळे हा आगामी काळात काळे गटाचा सरपंच पदाचा दावेदार असल्याची माहिती आहे.त्यामुळे कुरघोडीचे राजकारण चांगलेच रंगत आले असल्याचे बोलले जात आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या राजकारणाची आगामी चाहूल लागली असल्याचे मतदारांत बोलले जात आहे.दरम्यान या घटनेत ईशान्य आणि पश्चिम गडावरील हारकाऱ्यांची यंत्रणा कार्यरत झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.त्यामुळे ही रंगत आगामी काळात अधिकच रंग भरणार असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी माधव दगडू सांगळे यांनी गुन्हा क्रं.-446/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 118(2),126(2)351,352,115(2) वगैरे प्रमाणे दोन आरोपींवर गुन्हा दाखल आहे.जखमी विनोद सांगळे यांचेवर आधी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नंतर कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मसिंग सुंदर्डे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close