जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

‘जनआक्रोश आंदोलनाला जनतेचा अल्पआशीर्वाद ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)  

कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न जीवघेणा बनला असून त्यावर जनतेमधील संतापाच्या उद्रेकाला वाट करून देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला असून त्यात मोकाट जनावरांवर कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील शिवसेना,ज्येष्ठ नागरिक संघ आदी विविध संघटनांनी एकत्र येत बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १1.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी,’जनआक्रोश आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले नाही.

कोपरगाव शहर राष्ट्रवादीने अपुरी तयारी केल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांनी या आंदोलनाला अल्पसा प्रतिसाद दिला असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान याला विरोध म्हणून सत्ताधारी भाजप कोल्हे गटाने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे समोर चौकात एक फलक लावून शिर्डी-कोपरगाव रस्त्यावर सत्तरहून अधिक बळी गेलेल्या नागरिकांचा बळी गेला त्याची नैतिक जबाबदारी आ.काळे स्वीकारणार का ? असा सवाल करून त्यात त्यांचा निषेधाचा फलक झळकावला होता.त्यामुळे यावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.मात्र यात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निकत यांनी तातडीने दोन्ही गटांचे फलक तातडीने हटवले,तर पोलिसांनी त्यात तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

    कोपरगाव शहरांमधील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या जीवासाठी घातक ठरत आहेत.कोपरगावसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर बसणारी किंवा आपसात भिडणारी जनावरे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.यामुळे किशोर मनसाराम शिंदे आणि विकास अरुणराव डुंबरे आदीसह अनेकांना जीव गमवावा लागला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या चौकांमध्ये जनावरे उभी राहतात.रात्रीच्या वेळी किंवा वळणावर मोकाट जनावरे न दिसल्याने वाहने आदळतात.रस्त्यावर जनावरे आपसात भिडल्याने अचानक शिमगा केल्याने पादचारी आणि दुचाकीस्वार जखमी होतात.संबंधित या जनावरांचे मालक दूध काढून झाल्यानंतर किंवा वृद्ध झालेली जनावरे मालक मोकाट सोडतात.परिणामी त्यामुळे अनेक नागरिकांना अपघात होऊन आपल्या जीवाला हकनाक मुकावे लागत आहे.त्याबाबत विविध संघटनांनी लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई होत नाही आणि झाली तर जुजबी कारवाई करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होत असल्याने आता नागरिकांचे संयमाचा बांध फुटला असल्याचा दावा करण्यात आला होता.त्यामुळे आज दि.19 ऑगस्ट रोजी त्याबाबत निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता त्याकडे अनेकांचे लक्ष लागून होते.मात्र त्याला फारसा प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे राष्ट्रवादीचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचे मानले जात आहे.जनसामान्यांनी त्याला का प्रतिसाद दिला नाही हा वेगळा विषय होऊ शकतो.पण त्यात कायमच,” लांडगा आला रे…! ही हाळी कारणीभूत असावी असे बोलले जात आहे.

आंदोलनस्थळी कोपरगाव नगरपरिषदेच्या गट नेत्या गौरी पहाडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले तो क्षण.

दरम्यान यावेळी आंदोलकांनी कोपरगाव शहरात या मोकाट जनावरांच्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी किंवा त्यांना कोपरगाव नगरपरिषदेत नोकरीस घ्यावे अशी मागणी अनेकांनी केली आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून रहिले आहे.

     सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्मकांत,नगरसेवक कुदळे,जनार्दन कदम,राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,सुनील गांगुले,बाळासाहेब आढाव,बाजार समितीचे संचालक रामदास केकान,महमूद सय्यद,सुनील गंगूले,बाळासाहेब रुईकर,वाल्मीक अहिरे,माजी गटनेते विरेन बोरावके,सचिन गवारे,शिवाजी खांडेकर,सेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख,सोमनाथ आढाव,दिनकर खरे,गौरी पहाडे,स्मिता साबळे,माधवी राजेंद्र वाकचौरे,इम्तियाज अत्तार,सोनाली कपिले आदीसह बहुंसख्य कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख यांनी पालिकेवर हल्लाबोल चढवला तो क्षण.

“कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असल्याची कबुली देऊन त्यावर कोपरगाव नगरपरिषद आणि गोप्रेमी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.जवळपास एकाच दिवसात तेहतीस जनावरे पकडण्यात यश मिळाले आहे.मात्र आ.काळे गटाने नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढला मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद नागरिकांचा मिळाल्याने त्यांच्या गलिच्छ राजकारणाला नागरिकांनी झुगारले आहे”-राजेंद्र सोनवणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

 

यावेळी एका कार्यकर्त्याने यमाची भूमिका साकारून आपल्याला नवीन नगराध्यक्ष यांनी शंभर दिवसासाठी पाचारण केले असल्याचे सांगून त्या निर्णयाची खिल्ली उडवली असल्याचे दिसून आले आहे.

  त्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब,सुनिल गंगूले,सचिन गवारे,राष्ट्रवादीच्या गटनेत्या गौरी पहाडे,मंदार पहाडे,बाळासाहेब रुईकर,मेहमूद सय्यद,शहर प्रमुख गगन हाडा,अस्लम शेख,त्रिभुवन,अनील गायकवाड,वीरेन बोरावके सुनील फंड आदींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत.

  त्यावेळी कोपरगाव शहरात या मोकाट जनावरांच्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी किंवा त्यांना कोपरगाव नगरपरिषदेत नोकरीस घ्यावे अशी मागणी अनेकांनी केली आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून रहिले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close