जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मांजरीने दूध सांडवले,हाणामारी,गुन्हा दाखल!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   कोपरगाव तालुक्यातील सडे येथील फिर्यादी विजय गिताराम पंडीत (वय-40 वर्षे) यांचे घरात येवुन मांजरीने दुध व भाजी सांडवल्याने त्याबाबत फिर्यादी हे त्यांना समजावुन सांगत असताना त्याचा राग आल्याने आरोपी वसंत कारभारी देठे व त्याचा मुलगा विकास वसंत देठे दोघे रा.सडे यांनी फिर्यादीस विट व दगड हातात धरुन मारहाण केली असुन,वाईट-साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

दरम्यान आणखी एका घटनेत  30 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची काळ्या रंगाची व तिच्यावर लाल पट्टे असलेली पल्सर मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने चोरून नेली असल्याचा गुन्हा वारी येथील फिर्यादी सुमित मधुकर टेके (वय-38 वर्ष)यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

   महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामारी व हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.वडापाव खाताना धक्का लागणे,वाहतुकीत वाट देणे,किंवा शेजाऱ्यांचे वाद यांसारख्या अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे लोक टोकाचे पाऊल उचलत आहेत.यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वाढती दगदग,आर्थिक ताण आणि सहनशक्तीचा अभाव यामुळे लोकांचा राग अनावर होत आहे.परिणामी तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याची आणि तात्काळ बदला घेण्याची वृत्ती बळावत आहे.त्यातच कायद्याचा व पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे.त्याला आणखी एक कंगोरा असून तो मद्यपान किंवा इतर व्यसनांच्या प्रभावामुळे क्षुल्लक कारणांवरून हिंसक हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायत हद्दीत अशीच एक घटना समोर आली आहे.त्यातील फिर्यादी विजय पंडित याचे घरात शेजारी रहिवासी असलेल्या वसंत पंडित याचे मांजराने घुसून तेथील दूध आणि भाजी सांडवल्याने हा वाद उद्भवला आहे.त्यातून फिर्यादी पंडित हे आरोपी वसंत देठे आणि त्यांचे मुलगा विकास देठे यांना समजावून सांगण्यास गेले असता त्यांना आरोपी पिता वसंत देठे आणि त्यांचा पुत्र विकास देठे यांनी विट व दगड हातात धरुन मारहाण केली असुन वाईट-साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यां हे कुटुंब धास्तावले असल्याचे बोलले जात आहे.

  कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्र.344/2026 भारतीय न्याय सहिंता-2023 चे कलम 118 (1), 115 (2), 352, 351 (2) प्रमाणे आरोपी पितापुत्र याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रघु कारखेले हे करत आहेत.

  दरम्यान आणखी एका घटनेत  30 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची काळ्या रंगाची व तिच्यावर लाल पट्टे असलेली पल्सर मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने चोरून नेली असल्याचा गुन्हा वारी येथील फिर्यादी सुमित मधुकर टेके (वय-38 वर्ष)यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल केला आहे.त्यामुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close