जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

..या तीर्थक्षेत्री श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा प्रारंभ !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   शिर्डी येथी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था व नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दि.१३ ऑगस्‍ट, २०२६ ते गुरुवार दि.२० ऑगस्‍ट २०२६ या कालावधीत चालणा-या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून,या पारायण सोहळ्यात अंदाजे ०५ हजार हुन अधिक महिला व ०३ हजार हुन अधिक पुरुष असे सुमारे ०८ हजार पेक्षा अधिक पारायणा‍र्थींनी सहभाग घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत पुण्यकारक आणि मानसिक शांतता देणारे मानले जाते.श्रद्धेने व भक्तीने या ग्रंथाचे वाचन केल्याने साईबाबांची कृपा लाभते,संकटांमधून मार्ग सापडतो,इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व समाधान प्राप्त होते.हा ग्रंथ वाचल्याने मनातील ताणतणाव कमी होतो आणि अफाट मानसिक स्थैर्य व शांती मिळत असल्याचा भाविकाचा दावा आहे.

    श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत पुण्यकारक आणि मानसिक शांतता देणारे मानले जाते.श्रद्धेने व भक्तीने या ग्रंथाचे वाचन केल्याने साईबाबांची कृपा लाभते,संकटांमधून मार्ग सापडतो,इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व समाधान प्राप्त होते.हा ग्रंथ वाचल्याने मनातील ताणतणाव कमी होतो आणि अफाट मानसिक स्थैर्य व शांती मिळते.माणसाच्या आयुष्यात दु:ख किंवा अडचणी आल्यास पारायण केल्याने साईनाथांच्या मार्गदर्शनाचा आणि आधाराचा अनुभव येतो.शिवाय हा ग्रंथ माणसाला सद्वर्तनी,प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष बनवतो आणि साईबाबांना शरण जाण्याचा आणि त्यांच्या लीलामृतचा अनुभव घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मन जातो त्यामुळे या पारायण सोहळ्याला मोठी गर्दी वाढत चालली आहे.आज त्याचा अनुभव आला आहे.

  

श्री साईचरणी २१ लाख रुपये किमतीचे ०७ सोन्याचे नाणे अर्पण
श्री साईबाबांवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या भाविकाने आज श्री साईबाबांच्या चरणी २१ लाख ०९ हजार ६९१ रुपये किंमतीचे,१३६ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम वजनाचे ०७ नग सोन्याचे नाणे श्री साईचरणी अर्पण केले.ही देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त यांचा सत्कार केला आहे.सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही हे विशेष !

   आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे साईआश्रम भक्‍तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली होती.या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी,उप-मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा तर प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र.कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला.यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात,नाटय रसिक मंचाचे पदाधिकारी,मंदिर पुजारी,संस्‍थानचे कर्मचारी,ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

श्री साईचरणी २१ लाख रुपये किमतीचे ०७ सोन्याचे नाणे अर्पण केले त्याचे छायाचित्र.

   मिरवणूक पारायण मंडपात आल्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथ व कलश पूजन करुन,श्री साईसच्‍चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्‍यात आला.सकाळी ०७. ते ११.३० पुरूष वाचक व दुपारी ०१. ते ०५.३० महिला वाचक  यांचे यावेळेत श्री साईसच्‍चरिताचे वाचन करण्‍यात आले.तसेच सकाळी १०. ते ११.३० यावेळेत ब्राम्‍हण एकता मंच,शिर्डी यांचे विष्‍णु सहस्‍त्रनाम पठण कार्यक्रम,दुपारी ०१. ते ०३. यावेळेत श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर,शिर्डी शाळेच्‍या विद्यार्थीनींचा सांस्‍कृतिक कार्यक्रम व दुपारी ०३.ते ०५.यावेळेत श्री साईबाबा इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल,शिर्डी (प्राथमिक विभाग) यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र.३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात संपन्‍न झाला.तर,सायंकाळी ०५. ते ०६. यावेळेत प्रा.सुनिल कांडेकर यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा व रात्रौ.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प.कु. ओंकार महाराज बोचरे,श्री ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर,निमगाव को-हाळे यांचे हरी किर्तन संपन्न  होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close