कोपरगाव तालुका
…या तालुक्यातील विकासकामांना निधी !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विविध प्रलंबित कामासाठी महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र.२१) रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी ४० लाख रुपये,कोळगाव थडी येथील ग्रामीण मार्ग क्र.२९ ते इब्राहिम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३५ लाख रुपये,वेस येथील मुस्लीम गल्लीत सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी २० लाख रुपये,चितळी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधण्यासाठी २० लाख रुपये,तसेच रवंदे येथील कब्रस्तान सुशोभीकरण व सी.डी.वर्क करण्यासाठी १५.५० लाख रुपये आदींचा समावेश आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.कोपरगाव-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग,झगडे फाटा-रांजणगाव देशमुख रस्ता (राज्य मार्ग ६५),आणि साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनचा ७ कोटींचा चौपदरी रस्ता अवघ्या काही वर्षांतच खचल्याने नागरिक त्रस्त आहेत.खड्डे,उडणारी धूळ व सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेले रस्ते काही महिन्यांतच उखडले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.खराब रस्ते आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालक व नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. महामार्गालगतची अतिक्रमणे आणि रस्त्यांची अपूर्ण कामे यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दळणवळण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरूस्ती व पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे.मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.ग्रामीण भागातील काही रस्ते आणि विकास कामांचा आ.काळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला असून यातील काही रस्ते आणि विकासकामे मंजूर झाली आहे.त्यातील काही कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.यात प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र.२१) रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी ४० लाख रुपये,कोळगाव थडी येथील ग्रामीण मार्ग क्र.२९ ते इब्राहिम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३५ लाख रुपये,वेस येथील मुस्लीम गल्लीत सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी २० लाख रुपये,चितळी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधण्यासाठी २० लाख रुपये,तसेच रवंदे येथील कब्रस्तान सुशोभीकरण व सी.डी.वर्क करण्यासाठी १५.५० लाख रुपये मंजूर झाले असून या सर्व कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
या विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार आहे.रस्ते,सार्वजनिक सुविधा,सामाजिक व धार्मिक स्थळांचा विकास यामुळे नागरिकांच्या अडचणी कायमच्या दूर होणार असून संबंधित गावांतील नागरिकांना रस्ते,सुरक्षित सार्वजनिक सुविधा आणि आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे चितळी,वेस, माहेगाव देशमुख,कोळगाव थडी,रवंदे आदी गावांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



