जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात खताचा अवैध साठा,दोघांवर गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आरोपी दुकानदार किशोर चंद्रकांत टिळेकर व दादासाहेब विठ्ठल मोरे यांनी आपल्या मे.मंजूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या दुकानात इफको कंपनीचा रासायनिक खातांचा बेहिशोबी साठा ठेवला असता तो खत नियंत्रक निरीक्षक असलेल्या गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी तपासाला असता त्यात मोठी विसंगती आढळून आल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या कारवाईचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

कोपरगाव तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे.बाबत कोपरगाव तालुका कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन या लुटणाऱ्या दुकानदारांना वठणीस आणावे लागणार आहे.त्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालणार आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

      रासायनिक खतांची अवैध साठेबाजी हा शेती क्षेत्रातील एक अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे.यामुळे थेट शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्याचा शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.त्याचे शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होत असून बाजारात खतांची मागणी जास्त असताना काही विक्रेते साठा लपवून ठेवतात.टंचाई दाखवून शेतकऱ्यांकडून छापील किमती पेक्षा जास्त पैसे उकळतात.खत पाहिजे असल्यास शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर नको असलेली औषधे किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स खरेदी करायला लावणे.ऐन हंगामात खते महाग मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.वेळेवर खत न मिळाल्यास पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते.खतांसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहे.याबाबी ‘कायदेशीर तरतुदी आवश्यक वस्तू कायदा’या कायद्यांतर्गत येतात.साठेबाजी करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.खत नियंत्रण आदेश यानुसार प्रत्येक विक्रेत्याला दुकानाबाहेर खतांचा साठा आणि किमतीचा फलक लावणे व त्याची ऑनलाइन नोंद ठेवणे ही बाब बंधनकारक असताना कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत नुकताच मंजूर हद्दीतील मंजूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या दुकानदाराचा प्रताप उघड झाला आहे.त्यात त्याने प्रत्यक्षात आपल्या गोदामात जास्त साठा असताना तो ऑनलाईन रेकॉर्डला कमी दाखवून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू ठेवली होती.याबाबत काही शेतकऱ्यांनी कोपरगाव तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी विभागाचे खत नियंत्रक आणि निरीक्षक गणेश बिरडवडे यांनी या दुकानाची तपासणी केली असता त्यात मोठी तफावत आढळून आली आहे.यात में.मंजूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचा सचिव किशोर चंद्रकांत टिळेकर दोषी आढळून आला आहे.खत निरीक्षक बेदवडे यांनी तेथील खरेदी विक्रीची बिले,पुस्तके,इ-पास तपासले असता त्यात साठा पुस्तक आढळून आले नाही.खरेदी बिलाचा अभाव आढळून आला आहे.परवान्यात एकच गोदाम दाखविण्यात आले होते.त्याठिकाणी 354 गोव्यातील 15.93 मेट्रिक टन साठा आढळून आला आहे.मात्र इ-पास वर साठा शिल्लक दाखवला नाही.परिणामी शासनाची फसवणूक केली आहे.यामुळे अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने हा घोटाळा उघड झाला आहे.व त्यातील 93 हजार 341 रुपयांचा 354 गोण्यांचा माल जप्त केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत कृषी अधिकारी आणि खत निरीक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

  दरम्यान याबाबत खत निरीक्षक यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 309/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) चा भंग केला आहे.खत निर्यंत्रण आदेश खंड -7,खंड -12, खंड -28(1),(ए) खंड -35 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(2)(सी)(डी)(ई)(एफ),7(1),(1)(2) अन्वये गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close