जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

जेष्ठ नागरिक,महिलांसाठी बस प्रवास सवलत कार्ड शिबिर संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   महाराष्ट्र शासनाने एस.टी.बस प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एन.सी.एम.सी.) हे आधार-संलग्न स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे.हे रूपे-सक्षम स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक असून,याशिवाय सवलत मिळणे शक्य नाही.त्यासाठी जवळके ग्रामपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिक,महिला व मुलींसाठी जवळके ग्रामपंचायतीने नुकतेच हनुमान मंदिर सभागृहात शिबिर आयोजित केले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सरपंच सारिका विजय थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

जवळके ग्रामपंचायतीने यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा एक लाखाहून अधिकची वृक्ष लागवड त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे हस्ते पुरस्कार,हागणदारी मुक्त ग्राम,तंटामुक्त ग्राम,लोकराज्य ग्राम,अहिल्याबाई होळकर पुरस्कार,गेली दोन वर्षे जिल्हा स्तरीय प्रथम क्षयमुक्तग्राम पुरस्कार,नुकताच पाच लाख रुपयांचा मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पुरस्कार आदी पुरस्कार मिळवले आहे.त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील ग्रामस्थांसाठी वेळोवेळी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे.त्याअंतर्गत जंगली महाराज आश्रम ट्रस्टचा दर शुक्रवारी आत्मा मालिक मोफत दवाखाना,साईबाबा संस्थानचा फिरता दवाखाना,यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा एक लाखाहून अधिकची वृक्ष लागवड त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे हस्ते पुरस्कार,हागणदारी मुक्त ग्राम,तंटामुक्त ग्राम,लोकराज्य ग्राम,अहिल्याबाई होळकर पुरस्कार,गेली दोन वर्षे जिल्हा स्तरीय प्रथम क्षयमुक्तग्राम पुरस्कार,नुकताच पाच लाख रुपयांचा मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पुरस्कार आदी पुरस्कार मिळवले आहे.वर्तमान काळात राज्य परिवहन मंडळाने आता ज्येष्ठ नागरिक,महिला,बारा वर्षाच्या पुढील मुली यांना सवलतीच्या दरात प्रवास योजना सुरू केली आहे.त्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एन.सी.एम.सी.) अनिवार्य केले आहे.मात्र ज्येष्ठ नागरिक महिला आणि मुलींना कोपरगाव येथे येऊन सदर कार्ड काढणे जोखमीचे आणि खर्चिक बनत आहे.या योजनेअंतर्गत एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात ५० टक्के सवलत मिळत आहे.तर ज्येष्ठ नागरिकांना ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास मिळणार आहे.तर ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.विद्यार्थी,दिव्यांग आणि इतर पात्र घटकांना नियमानुसार सवलत मिळणार आहे.त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं होते.त्यातून ग्रामस्थांचा वेळ आली पैसा वाचण्यास मदत झाली आहे.या शिबिराचा अनेक महिला,ज्येष्ठ नागरिक आदींनी लाभ घेतला असून या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांचेसह सेतू चालक सोनाली सतीश कदम यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  सदर प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते एस.के.थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,शांताराम थोरात,दत्तात्रय वाकचौरे,नवनाथ शिंदे,खंडेराव थोरात आदी मान्यवरासह बहुसंख्य नागरिक महिला उपस्थित होत्या.दरम्यान तांत्रिक कारणामुळे अजून काही नागरिक आणि महिला बाकी असून त्यांच्यासाठी आगामी काळात पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्याची लवकरच तारीख जाहीर करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close