निधन वार्ता
शकुंतला बोरनारे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरत बोरनारे पाटील यांच्या मातोश्री गं.भा.शकुंतला किसन बोरनारे (वय -83) यांचे मंगळवार दि.२ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर रात्री ८ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कै.शकुंतला बोरनारे या दुध उत्पादकांचे नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या भाची तर पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या त्या आते बहीण होत्या.तसेच कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे संचालक सोमनाथ निरगुडे यांच्या त्या भगिनी होत्या.धार्मिक व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी संवत्सर परिसरात आपली ओळख निर्माण केलेली होती.पती कै.किसन बोरनारे यांच्या निधनानंतर कुटुंबाचा मोठा आधार म्हणून कै.शकुंतला यांनी आपले सर्व आयुष्य वेचले होते.कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुलांना,नातवंडांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मोठे योगदान दिले.त्यांच्या पश्चात लक्ष्मण बोरनारे,भरत बोरनारे ही मुले,दोन मुली,तर अजय,नितीन,हर्षद,यश,अभिजीत ही नातवंडे,सुना असा मोठा परिवार आहे.
कै.शकुंतला बोरनारे यांच्या निधनाबद्ल राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,कृष्णराव परजणे,राजेश परजणे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त केला आहे.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



