जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

…आता कमान साधू-संतांच्या हाती!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर असून,शेतीतील अस्थिरता,पिण्याच्या पाण्याची समस्या,आणि कष्टाचे जीवन यामुळे मुलींचे पालक शेतकरी मुलाला ‘नको’ म्हणत आहेत.३०-४० वर्षे वयोगटातील लाखो अविवाहित तरुण,सरकारी नोकरीला प्राधान्य,आणि मुलींच्या संख्येतील कमतरता यामुळे ही सामाजिक समस्या बनली असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र नेवासा येथील ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.त्यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने या प्रश्नाला वाचा फुटण्याची शक्यता मानली जात आहे.त्यामुळे साखर पट्ट्यातील गर्भश्रीमंत जिल्ह्यात परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

   

वर्तमानात शेतकऱ्यांचा कांदा रुपया किलोने विकूनही कोणी घेण्यास तयार नाही.रस्त्यावर आणि बाजार समितीत आणलेल्या कांद्याचे तो भाडे आणि हमाली,तोलाई देऊ शकत नाही.बाजार समितीत व्यापारी आणि समितीचे पदाधिकारी यांची मिलीभगत झाली आहे.न्याय कोणाकडे मागायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे नेते आणि त्यांच्या मतावर गब्बर झालेले वतनदार लोकप्रतिनिधी केवळ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या टोप्या स्वतःच्या डोक्यावर घालून स्वतःची मिजास दाखवत फिरताना दिसत आहे.

   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे.कृषी क्षेत्रातील अनिश्चितता,उत्पन्नाची कमतरता आणि मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे ग्रामीण भागातील लाखो तरुणांची लग्ने रखडली आहेत.३० ते ४० वर्षे वय उलटूनही स्थळे न मिळाल्यामुळे अनेक तरुण नैराश्यात आहेत.शेतीमालाला मिळणारा अस्थिर भाव आणि शेतीतील कमी नफा यामुळे मुलींच्या कुटुंबाकडून ‘शेतकरी नवरा नको ग बाई’ अशी भूमिका घेतली जात आहे.त्यातच ग्रामीण भागात मुलींचे प्रमाण कमी झाल्याने वधू मिळणे कठीण झाले आहे.उच्चशिक्षित किंवा नोकरी करणाऱ्या मुलींना शहरी जीवनशैली आणि नियमित मासिक पगाराची अपेक्षा असते,जी शेतकरी मुलांच्या बाबतीत पूर्ण होत नाही.परिणामी आज हे दाहक वास्तव समोर आले आहे.विशेषतः अहिल्यानगर आणि जळगावसारख्या जिल्ह्यांत हजारो तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.या समस्येमुळे अनेकदा तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असताना दिसत असून यावर शेतकरी संघटनेने आवाज उठवण्याचा स्तुत्य प्रयत्न सुरू केला आहे.याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी नुकतीच श्री क्षेत्र नेवासा येथील ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांची भेट घेऊन याबाबत संत आणि महंत यांना लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.या प्रसंगी महंत उद्धव महाराज यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली आहे हे विशेष !

राज्यातील कीर्तनकारांची मोठी परंपरा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासात कीर्तन परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे केवळ भक्तीचे माध्यम नसून,मनोरंजनातून समाज प्रबोधन आणि नैतिक मूल्यांची पेरणी करण्याचे एक प्रभावी साधन आहे.महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेत संत नामदेव महाराजांना महाराष्ट्रातील ‘आद्य कीर्तनकार’ मानले जाते.त्यांनी अभंगांच्या माध्यमातून वारकरी कीर्तन परंपरेचा पाया घातला.संत परंपरेपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांपर्यंतच्या कीर्तनकारांनी कीर्तनाचा वापर अंधश्रद्धा निर्मूलन,स्वच्छता आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी केला.राज्यातील अनेक अनिष्ट परंपरा त्यांनी नष्ट केल्या असल्याचे उदाहरणे आहे.त्यामुळे त्यांच्या परंपरेतील संतांनी जर उचल खाली तर या प्रश्नाला नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा व्यर्थ नाही.

   ह.भ.प.महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) हे संत सरला बेट येथील ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज यांचे शिष्य म्हणून व वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ,अभ्यासू आणि महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित कीर्तनकार मानले जात जातात.ज्ञानेश्वरी आणि वारकरी सिद्धांताच्या सखोल अभ्यासासाठी ते ओळखले जातात.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील रहिवासी असून त्यांना ‘उद्धव महाराज नेवासेकर’ म्हणूनही ओळखले जातात.वर्तमानात ते राहाता तालुक्यातील लोणी’वरद विनायक सेवाधाम’चे महंत म्हणून अध्यात्माचे आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्य पाहत आहेत.उद्धव महाराजांची कीर्तने ही अत्यंत शास्त्रशुद्ध,मार्मिक,ज्ञानावरील पकड असलेली आणि वारकरी संप्रदायाच्या सिद्धांतांना धरून असतात.महाराष्ट्रभरात होणाऱ्या विविध भव्य अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आणि दिंडी महोत्सवांमध्ये त्यांची कीर्तने आणि काल्याची कीर्तने विशेष लोकप्रिय आहेत.त्यामुळे हा प्रश्न राज्यभर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यातील कीर्तनकारांची मोठी परंपरा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासात कीर्तन परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे केवळ भक्तीचे माध्यम नसून,मनोरंजनातून समाज प्रबोधन आणि नैतिक मूल्यांची पेरणी करण्याचे एक प्रभावी साधन आहे.महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेत संत नामदेव महाराजांना महाराष्ट्रातील ‘आद्य कीर्तनकार’ मानले जाते.त्यांनी अभंगांच्या माध्यमातून वारकरी कीर्तन परंपरेचा पाया घातला.संत परंपरेपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांपर्यंतच्या कीर्तनकारांनी कीर्तनाचा वापर अंधश्रद्धा निर्मूलन,स्वच्छता आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी केला.राज्यातील अनेक अनिष्ट परंपरा त्यांनी नष्ट केल्या असल्याचे उदाहरणे आहे.त्यामुळे त्यांच्या परंपरेतील संतांनी जर उचल खाली तर या प्रश्नाला नक्कीच राज्यव्यापी प्रसिद्धी मिळून सरकारचे या प्रश्नी लक्ष वेधू शकतात असे मानले जात आहे.

  

“कधीकाळी पाठ्यपुस्तकातील परमेश्वराला पुरून उरलेला आणि जगाचा पोशिंदा असलेला चतुर शेतकरी आता व्यवस्थेने लाचार ठरवला आहे.त्याला सन्मान तर दूरच पण उपेक्षेचे धनी ठरावे लागत आहे.शेतकरी नेते चाळीशी ओलांडलेल्या तरुणांना न्याय देणार की केवळ त्यांचा आपल्या निवडणुकांपुरता वापर करणार असा सवाल निर्माण झाला आहे,ही व्यवस्था बदलावी लागणार आहे.या परिवर्तन चळवळीशी तरुणांनी जोडून घ्यायला हवे” – ॲड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

   दुष्काळाने राज्यात दर पाच वर्षात तीन वर्षे ठाण मांडलेले असते.परिणामी कधी निसर्गाचा कोप तर कधी शेतकऱ्याप्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाले आहेच.त्याचे  गंभीर सामाजिक परिणाम दिसू लागले आहेत.शेतकरी असल्यामुळे अनेक मुलांची लग्न जमत नाहीत.संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एका माहितीनुसार एकट्या जळगावमध्ये जवळपास लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत.लग्नाचं वय निघून गेलं तरी लग्न जमत नसल्याचं गंभीर वास्तव समोर आले आहे.शेतकऱ्यांच्या प्रति शासनाच्या उदासीन धोरणाबरोबर कधी निसर्गाचा कोप,यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षात शेतीमध्ये लावलेला खर्चही मिळत असल्याने शेतकरी नैराश्यात जाताना दिसत आहे.अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे राज्यभर आहेत.दिवसरात्र काबाड कष्ट करूनही जगाचं पोट भरणाऱ्या या पोशिंद्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं पोटभरणे अवघड झाल्याचं चित्र संपूर्ण जगाच्या समोर आले आहे.शेतकरी परिवारात आपली मुलगी दिली तर तिचं भविष्य काय असेल अशी चिंता मुलीच्या वडील आणि पालकांना सतावत आहे.परिणामस्वरूप मुलीच्या भविष्यासाठी पालकं शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देण्यास टाळाटाळ करत आहेत.अनेकजण नोकरदारवर्गांना मुली देण्यास प्राधान्य देत आहेत.शिक्षण झालेल्या मुली शहरातमध्ये स्थायिक होतात,ते नोकरदाराला लग्नासाठी प्राधान्य देतात.आता हुंड्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे.मागील वीस पंचवीस वर्षांपूर्वी हुंडा देण्याघेण्याची अनिष्ट प्रथा समाजामध्ये होतीच.त्यामुळे गर्भलिंग निदान करण्यास फारसे कडक निर्बंध नसल्याने,अनेक पालकांनी त्या काळी मुलीची जबाबदारी नको,म्हणून सर्रास गर्भ लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ काढून टाकला.त्याचा परिणाम म्हणून मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याने आज त्याचे परिणाम विवाह योग्य शेतकरी तरुणांना भोगावे लागत आहेत.आजही कोपरगाव,राहाता तालुक्यात पोलिस आणि प्रशासनाच्या नाकाखाली टिच्चून राजरोस हे प्रकार सुरू आहे.राहाता या ठिकाणी एक टोळी पकडली असली तरी हे हिमनगाचे केवळ एक टोक आहे.येवला तालुक्यातील अंदरसुल,कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव,टाकळी आदी परिसरात पन्नास हजार रुपये घेऊन हे पाप आजही ग्रामीण भागात डॉक्टर म्हणून मिरवणारे काही दलाल मनोभावे करताना दिसत आहे.परिणाम आज समोर आहेच.आज वयात आलेल्या मुली नाही अशी बाब नाही मात्र यांचे हजारी प्रमाण केवळ 850 वर आले आहे.परिणामी आज विवाह योग्य वयातील मुलींचा ओढा नोकरी आणि बड्या व्यावसायिक मुलांकडे अधिक असल्याने शेतकरी मुलांना मुली देण्यासाठी कोणीही तयार होताना दिसत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होताना दिसत आहे.मुलीचं शिक्षण जास्त होताना दिसत आहे.

दरम्यान या व्यवस्थेचा गैरफायदा उचलणाऱ्या टोळ्या निर्माण होऊन विवाह जमविण्यासाठी आणि लग्नासाठी गावोगाव दलाल निर्माण झाले असून डझन अर्धा डझन लग्ने लावलेल्या टोळ्या पैसा हाती पडल्या की,रातोरात धूम ठोकताना दिसत आहे.अविवाहित शेतकऱ्याचा मुलगा आणि तो शेतकरी नागवला जात आहे.त्यातच मोबाईलने तरुण पिढी उध्वस्त केली असून ही तरुण मुलांची पिढी (मो)बाईल वेडे झाले आहे.त्यामुळे शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.जे शिकले ते मागे पाहण्यास तयार नाही.

   दरम्यान या व्यवस्थेचा गैरफायदा उचलणाऱ्या टोळ्या निर्माण होऊन विवाह जमविण्यासाठी आणि लग्नासाठी गावोगाव दलाल निर्माण झाले असून डझन अर्धा डझन लग्ने लावलेल्या टोळ्या पैसा हाती पडल्या की,रातोरात धूम ठोकताना दिसत आहे.अविवाहित शेतकऱ्याचा मुलगा आणि तो शेतकरी नागवला जात आहे.त्यातच मोबाईलने तरुण पिढी उध्वस्त केली असून ही तरुण मुलांची पिढी (मो)बाईल वेडे झाले आहे.त्यामुळे शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.जे शिकले ते मागे पाहण्यास तयार नाही.उरले त्याला पुढारी निवडणुकीत दारूच्या बाटल्या आणि हजार-पाचशे देऊन व्यसनाच्या खाईत लोटत असताना दिसून येत आहे.नंतर हिच मुले आपल्या बापाच्या डोक्यात दगड घालताना दिसून येत आहे.त्यांचा सख्खा भाऊ असला तरीही त्याला पायदळी तुडवताना दिसत आहे.ही दरी कधी मिटणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.यातून शेतकरी संघटना आणि संत यांची या प्रकरणी युती होत असेल तर ही राज्यासाठी मोठी सुदैवी घटना मानली पाहिजे.

   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एन.सी.आर.बी.) ताज्या अहवालानुसार,देशात दरवर्षी सरासरी १० हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात.देशभरातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३८ टक्के ते ४०टक्के एकट्या महाराष्ट्रात होतात.नापिकी,कर्जबाजारीपणा आणि हवामानातील अनिश्चितता ही यामागील मुख्य कारणे असल्याचे सांगितले जाते.शेतकरी आत्महत्यांच्या राष्ट्रीय नोंदणीबद्दलची राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी पाहिली तर देशभरात वर्षाला सरासरी १० हजार ते १० हजार ७०० शेतकरी व शेतमजूर जीवन संपवतात.यात राष्ट्रीय पातळीवर शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष ! राज्यात दररोज सरासरी ६ ते ८ शेतकरी आत्महत्या करतात.मात्र महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कर्नाटक,आंध्र प्रदेश,मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत होतात.विशेष म्हणजे तुलनेने मागास गाली जाणारी अनेक राज्ये जसे की अरुणाचल प्रदेश,गोवा,पश्चिम बंगाल,दिल्ली आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण नगण्य किंवा जवळजवळ शून्य आहे.याला काय म्हणणार ? देशात आमचे राज्य क्रमांक एकचे म्हणताना राज्यातील नेत्यांना थोडीही शरम वाटताना दिसत नाही.पश्चिम महाराष्ट्र हा सर्वात प्रगत मानला जातो मात्र या भागातही आजही शेतकरी आत्महत्या करताना दिसून येत आहे.साखर सम्राट मात्र या भागाचे गुलाबी चित्र रंगविण्यात मग्न आहे.राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरून आपल्याला संस्थानानां संरक्षण पुरविण्यासाठी विधानपरिषदेत जाऊन बसण्यासाठी पदे विकत आणताना दिसत आहे.

   याबाबत एक सत्य घटना सांगणे अगत्याचे आहे.शेतकऱ्याच्या मुलांना मुली देण्यास कोणीही तयार होत नाही.निळवंडे लाभक्षेत्रात सामाजिक काम करताना अनेक कटू अनुभव आले आहे.एका वृद्ध शेतकऱ्यानं आपल्या चाळीशी उलटून गेलेल्या तरण्याबांड पोराला मुलगी मिळावी म्हणून जंग जंग पछाडले पण मुलगी मिळाली नाही.हताश वडील थकून भागून गेले.शेवटी आपल्या दारात आलेल्या हरेक व्यक्ती,पाहुणेरावळे आदींना उपवर मुलास मुलगी मिळावी म्हणून गळ घालण्यास त्यांनी सुरुवात केली.वय उलटून गेलेल्या मुलाला हे पाहवले नाही.त्याने अखेर तुटक्या बाजेवर झाडाखाली बसलेल्या आपल्या वडीलांना दारात आलेल्या पैपाहुण्यांसमोरच सांगून टाकले,”दादा,थांबा आता,” आता काय माझे लग्नाचे वय राहिले का ? कशाला सोन्यासारखे दात कण्यासारखे करता” उपस्थित पाहुण्याच्या पोटात कालवाकालव न झाली तर नवल ! हे आजचे दुष्काळी आणि ग्रामीण महाराष्ट्राचे दुर्दैवी चित्र आहे.वर्तमानात शेतकऱ्यांचा कांदा रुपया किलोने विकूनही कोणी घेण्यास तयार नाही.रस्त्यावर आणि बाजार समितीत आणलेल्या कांद्याचे तो भाडे आणि हमाली,तोलाई देऊ शकत नाही.बाजार समितीत व्यापारी आणि समितीचे पदाधिकारी यांची मिलीभगत झाली आहे.न्याय कोणाकडे मागायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे नेते आणि त्यांच्या मतावर गब्बर झालेले वतनदार लोकप्रतिनिधी केवळ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या टोप्या स्वतःच्या डोक्यावर घालून स्वतःची मिजास दाखवत फिरताना दिसत आहे.याची कोणालाही लाज आणि शरम वाटताना दिसत नाही हे विशेष !

   शेतकरी संघटनेने सत्कार केलेल्या सोहळ्यात महंत उद्धव महाराज यांनी,”अविवाहित शेतकरी मुलांच्या लग्न समस्येची प्रमुख कारणे सांगताना,” शेतकरी मुलींचे पालक आता फक्त सरकारी नोकरी असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत.शेतकरी बापच शेतकरी मुलाला मुलगी देत नाहीः स्वतः शेतकरी असलेले पालकही आपल्या मुलीचे लग्न शेतकरी कुटुंबात करण्यास नकार देत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले आहे.आर्थिक अस्थिरता व कष्ट-शेतीतील ओला-सुका दुष्काळ,कमी उत्पन्न आणि वाढलेला उत्पादन खर्च यांमुळे होणारी आर्थिक फरफट,ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासह चांगल्या जीवनशैलीच्या अपेक्षा व स्वतंत्र घराची अट,सामाजिक दबाव,मुलांच्या वयाची चाळीशी ओलांडली तरी लग्न न झाल्याने कुटुंबावर येणारा मानसिक तणाव,मुलींची संख्या कमी झाल्यामुळे लग्नासाठी स्पर्धा वाढली असल्याची खंत देखील व्यक्त केली आहे.महंत उद्धव महाराज यांनी आपल्या प्रबोधनामधून महाराष्ट्रातल्या शेतकरी महाराष्ट्रातील सर्व संतांनी आता आपल्या प्रबोधनातून शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त केल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच लवकरच न्याय मिळेल ही अपेक्षा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी व्यक्त केली ती कोणीही वावगी ठरू शकत नाही.त्याला आपल्या प्रबोधनातून महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी करुन नवा आदर्श निर्माण केल्याने आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता तो आगामी काळात सार्थ ठरो हीच अपेक्षा व्यक्त करणे आपल्या हाती आहे.आता पुढारी,प्रशासन हतबल ठरले आहे.त्यामुळे आता ही कमान साधू संतांच्या हाती…! म्हटले तर वावगे ठरू नये इतकेच !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close