जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कमलाबाई ठोळे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर संघटनेचे व कोपरगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष व उद्योजक कैलास भागचंद ठोळे यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई भागचंद ठोळे (वय -95) यांचे नुकतेच वृद्धापकाळानं निधन झाले आहे.त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन उपस्थित अनेक वक्त्यांनी केले आहे.त्यांचे पश्चात दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  

स्व.कमलाबाई भागचंद ठोळे यांचे छायाचित्र.

स्व.कमलाबाई ठोळे या अत्यंत धार्मिक,मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि तालुक्यात परिचित होत्या.त्यांनी आपल्या हयातीत आजतागायत शालेय विद्यार्थी,गोरगरीब गरजू रुग्णांना,महापुर ग्रस्तांना,कोरोना ग्रस्तांना,ग्रामीण रुग्णालयाला वेळोवेळी औषधे,मशीनरी,वैद्यकीय साधने उपलब्ध करून दिली आहेत.त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  स्व.कमलाबाई ठोळे या अतिशय धार्मिक व समाजाभिमुख कार्यात नेहमी अग्रेसर होत्या.आजच्या काळातही कै.कमलाबाई ठोळे यांनी एकत्र कुटूंब पध्दती मनोभावे जपली होती.कोपरगांव जेष्ठ नागरीक मंचच्या संस्थापक अध्यक्ष होत्या.महाराष्ट्र स्टेट फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड असोसिएशन माफदा’चे माजी अध्यक्ष व कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक कैलास ठोळे तसेच सोना पॉली प्लास्ट प्रा.लि.चे संचालक प्रकाश ठोळे यांच्या त्या मातोश्री होत्या. कोपरगांव क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष राजेश ठोळे यांच्या त्या आजी होत्या.

  ठोळे यांचे कुटुंब कोपरगाव येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर मानले जाते.त्यांनी आपल्या पतीच्या खांद्यास खांदा देऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला होता.त्यांचेवर कोपरगाव येथील गोदावरी तिरी नगरपरिषद अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांचे स्मरणार्थ महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उद्योजक कैलास ठोळे यांनी सांगितले आहे.

   स्व.कमलाबाई ठोळे या अत्यंत धार्मिक,मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि तालुक्यात परिचित होत्या.त्यांनी आपल्या हयातीत आजतागायत शालेय विद्यार्थी,गोरगरीब गरजू रुग्णांना,महापुर ग्रस्तांना,कोरोना ग्रस्तांना,ग्रामीण रुग्णालयाला वेळोवेळी औषधे,मशीनरी,वैद्यकीय साधने उपलब्ध करून दिली आहेत. ठोळे परिवाराने लायन्स क्लबच्या माध्यमातून,क्रेडाई संस्थेच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण जतन संवर्धनासाठी संरक्षक जाळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

   सदर प्रसंगी श्रद्धांजली सभेत सुवालाल भंडारी यांनी आईवर आधारित गित सादर केले.तर साहेबराव शिलेदार,पुरुषोत्तम पगारे,उद्योजक वाबळे,जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या संगिता मालकर,छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर,ह.भ.प.थोरे महाराज,घुगे,उत्तमभाई शहा,अनिल पांढरे, डॉ.भडांगे,सेवानिवृत पोलिस अधिकारी श्री.पवार आदींनी त्यांना श्रद्धांजलीपर अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close