निवडणूक
…या युवानेत्याचा विधानपरिषद अर्ज अखेर दाखल!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज भाजपच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला आहे.त्याचे कोल्हे समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे.त्यांच्या उमेदवारीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला दोन उमेदवार मिळणार आहे.त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा उंचावणार असल्याचे दिसून येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे.त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांना त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.याचे कोपरगाव तालुक्यात स्वागत होत आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज ३० एप्रिल २०२६ शेवटचा दिवस होता.भाजप,शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाकडून प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून,काँग्रेसने माघार घेतल्याने आणि अतिरिक्त उमेदवार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही का? की भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाणार,याबाबतचे सर्व तर्क-वितर्क अखेर आज संपुष्टात आले.शिवसेनेचा दहावा चेहरा किंवा मतांचा ‘घोडेबाजार’ या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीकडून आठ आणि महाविकास आघाडीकडून एक असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले.अतिरिक्त उमेदवारी न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.भाजपनानं आपली पाच उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करून आघाडी घेतली होती.मात्र,शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली होती.आज अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असताना,दुपारी एकच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे.त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सरकारच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी पक्षाचा एक सैनिक म्हणून अहोरात्र काम करण्याचा आमचा मानस आहे.ग्रामीण अर्थव्यवस्था ही सहकारावर अवलंबून असून ज्या-ज्या ठिकाणी सहकार फुललेला आहे तेथील शेतकऱ्यांचा दरडोही उत्पन्न अधिक वाढविण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याबरोबर युवकाना बळ देणार आहे”-विवेक कोल्हे,विधानपरिषद उमेदवार,कोपरगाव.
सदर प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री जयप्रकाश गोरे,मंत्री आशिष शेलार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे तसेच माजी आ.स्नेहलता कोल्हे आदी प्रमुख मान्यवरांसह कोल्हे समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजप उमेदवार विवेक कोल्हे यांनी बोलताना सांगितले की,”सरकारच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी पक्षाचा एक सैनिक म्हणून अहोरात्र काम करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही सहकारावर अवलंबून असून ज्या-ज्या ठिकाणी सहकार फुललेला आहे तेथील शेतकऱ्यांचा दरडोही उत्पन्न वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.ज्या सरकारी योजना व पक्षाच्या ज्या सूचना असतील त्या आम्ही ग्रामीण भागात अंमलबजावणी करून ग्रामीण अर्थकारणाला सक्षम करण्याबरोबरच युवाशक्तीचे संघटन करणार आहे असल्याचे म्हटलं आहे.


