जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

लक्ष्मीबाई वाकचौरे यांचे निधन

न्यूजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

   कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील रहिवासी गं.भा.लक्ष्मीबाई कारभारी वाकचौरे यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले.मृत्युसमयी त्या १०३ वर्षाच्या होत्या.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

गं.भा.लक्ष्मीबाई ह्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या होत्या.गृहिणी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.परिसरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली होती.

  

   त्यांच्या पश्चात शंकर वाकचौरे,राजेंद्र वाकचौरे व संजय वाकचौरे ही तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.संजीवनी उद्योग समुहाचे प्रमुख बिपीन कोल्हे, माजी आ.स्नेहलता कोल्हे,संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे यांनी गं.भा.लक्ष्मीबाई यांच्या निधनाबदल शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close