जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पैशाच्या कारणावरून एकास बेदम मारहाण,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील रहिवासी तरूण गौतम बनसोडे याने घेतलेले उसने पैसे वेळेत दिले नाही या कारणावरून त्याला मुंबई येथील महाले नावाची आरोपी महिलेने सांगितल्यावरून त्याला आरोपी संकेत मगर व अन्य दोघांनी हॉकी स्टिकच्या सहाय्याने बेदम मारहाण केली आहे.त्यामुळे तो अर्धमेला होऊन पडला असता त्याला कोणीही लवकरच उचलले नाही.मात्र नंतर ही बाब पोलिसांना कळल्याने त्यांनी यास रुग्णालयात भरती केले असून त्यावर उपचार सुरू आहे.

कोपरगाव शहर पोलिस ठाणे.

दरम्यान या ठिकाणी सदर तरुणाला मारहाण होऊन त्याचे चलचित्रण नजीकच्या ‘हॉटेल आनंद’ मधील कॅमेऱ्यात झाले असल्याचे समजत आहे.मारहाण झाल्यानंतर संबंधित घटनेची खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळणे गरजेचे होते.मात्र त्यांनी त्यात कुचराई केली असल्याची माहिती आहे.त्यामुळे सदर जखमी इसम घटनास्थळी दहा ते पंधरा मिनिट त्या ठिकाणी पडून होता.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  कोपरगाव शहरातील तहसील परिसरात काही तरुण नागरिकांना जातीचा दाखला काढून देतो,उत्पन्नाचा दाखला काढून देतो,नॉन क्रिमिलर दाखला काढणे आदी कामे करून देण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी लगट करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना लाखो,हजारो रुपयांना फसवत असल्याचे खुप उदाहरणे आहे.त्यात काही तहसील मधील कर्मचारी सामील असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.एकदा पैसे हाती पडले की हे बेताल तरूण नंतर आपली लायकी दाखवण्यास मागेपुढे पाहत नाही.त्यामुळे अनेक वेळा अनेक ज्येष्ठ नागरिक,महिला,सेवानिवृत कर्मचारी ग्रामीण तरुण त्याला बळी पडून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो.त्यातून वादविवाद निर्माण होत असतात.त्यामुळे शहरातील शांती भंग पावत असल्याचे आढळून आले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण दोन कि.मी. अंतरावर ‘हॉटेल आनंद’ समोर 18 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.यातील जखमी तरुणाने तेथील हजर महिलेकडून काही रक्कम उसनी घेतली असल्याची माहिती आहे.मात्र तो वारंवार मागणी करूनही देत नसल्याने त्यांनी त्याला तगादा लावला होता.मात्र जखमी तरुणाने त्याची एक ना सुनी.परिणामी त्यांचा संताप अनावर झाला असल्याची बातमी नागरिकांत चर्चली जात आहे.या वादातून महाले नामक महिलेने आपल्या जवळच्या काही तरुणास ही बातमी सांगितली होती.ते जखमी तरुणाचे पाळतीवर होते.त्यांनी त्याला पुणतांबा चौफुली जवळ असलेल्या ‘हॉटेल आनंद समोर दुपारी 4.30 वाजता गाठले आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने बेदम मारहाण केली आहे.त्याला त्यात डोक्याला आणि इतरत्र गंभीर दुखापत झाली असल्याचे समजत आहे.दरम्यान या जखमीवर यापूर्वी तहसील कार्यालयात हल्ला केल्या प्रकरणी व तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती नागरिकांत आणि प्रशासनात चर्चेली जात आहे.

  दरम्यान या ठिकाणी सदर तरुणाला मारहाण होऊन त्याचे चलचित्रण नजीकच्या ‘हॉटेल आनंद’ मधील कॅमेऱ्यात झाले असल्याचे समजत आहे.मारहाण झाल्यानंतर संबंधित घटनेची खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळणे गरजेचे होते.मात्र त्यांनी त्यात कुचराई केली असल्याची माहिती आहे.त्यामुळे सदर जखमी इसम घटनास्थळी दहा ते पंधरा मिनिट त्या ठिकाणी पडून होता.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून हॉटेल चालक आणि व्यवस्थापन यांची चांगलीच काम उघडणी केली असल्याची माहिती आहे.या ठिकाणी घडलेली आणि त्याची खबर लवकर न दिल्याची ही दुसरी घटना असल्याचे समजत आहे.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी यांनी दखल केलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद क्र.132/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 326,118(2),118(1),115,352,352(2) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close