जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

संशयास्पद अवजड वाहन,पोलिस दखल घेईना !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात आणि तालुक्यात अवैध गुन्हे आणि गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असताना गेले आठ दिवस इंदिरा पथ मार्गावर टाटा कंपनीचा एक व पिवळा-निळ्या रंगाचा संशयास्पद ट्रक (क्रमांक एम.एच. 41 ए.यू.5664) उभा असून त्याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करून ही यावर पोलिसांनी चौकशी केली नसल्याची बाब नागरिकांनी उघडकीस आणली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेच ते संशयास्पद अवजड वाहन छायाचित्रात दिसत आहे.

  

दरम्यान याबाबत जागृत व ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी आज दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत खबर दिली आहे.मात्र गेली दोन तीन तास उलटूनही यावर पोलिसांनी ही बाब गंभीरने घेतली असल्याचे दिसून आले नाही.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यातील चोऱ्या,माऱ्या,वाळू,गुटखा,मटका आदी अवैध व्यवसाय,गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढत चालला असून त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोपींकडे गावठी कट्टे आढळून येत असून नुकताच संवत्सर येथील एक चांगल्या तरुणाचा बळी गेला असल्याची संवत्सर आणि परिसरात चर्चा आहे.या किरकोळ गुन्ह्यात आरोपी कट्टे,कोयते,तलवारी आदींचा सर्रास वापर करताना दिसत आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यातील नागरिकांत हा प्रामुख्याने चिंतेचा विषय बनला आहे.त्यातच गेली आठ दिवस शहरातील इंदिरा पथ या वर्दळ असलेल्या रस्त्यावर गणपती मंदिराजवळ एक वरील कंपनीचा व क्रमांकाचा ट्रक उभा असून तो नेमका कोणाचा आहे.आणि गेली आठ दिवस तो तेथेच का थांबला आहे.याचे नजीकच्या नागरिकांना उत्तर मिळाले नाही.त्यामुळे त्यांचा संशय वाढला आहे.

   दरम्यान याबाबत जागृत व ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी आज दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत खबर दिली आहे.मात्र गेली दोन तीन तास उलटूनही यावर पोलिसांनी ही बाब गंभीरने घेतली असल्याचे दिसून आले नाही.याबाबत यांचेसह नजीकच्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.व याबाबत तातडीने खबरदारी घेऊन सदर अवजड वाहन कोणाचे आहे.याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी धुमाळ यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close