गुन्हे विषयक
‘ऑल आऊट’ मोहिमेत आठ बाद,दोन तलवारी जप्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आगामी शिव जयंतीच्या पार्श्वभूमविर कोपरगाव शहर पोलिसांनी शहरात शांतता भंग होऊ नये यासाठी राबवलेल्या कारवाईत त्यांना हनुमाननगर 105 मध्ये अर्जुन राजू सोनवणे व विशाल संजय जगधने आदी दोन आरोपींकडे दोन तलवारी आढळून आल्या असून या शिवाय अवैध जुगार प्रकरणी हर्षल सुरेश गवळी व किशोर शंकर दीक्षित आदी दोघांवर धाड टाकून पोलिसांनी त्यांचेकडून 03 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यासाठी अवैध दारू प्रकरणी बाळासाहेब केशव आहेर,गोरख बळीराम पवार तर गुटखा प्रकरणी साहिल उमर कुरेशी,नदीम सलीम शेख आदी विरुद्ध कारवाई केली असल्याचे अवैध व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव शहरात उपद्रव मूल्य पोहचविणाऱ्या असामाजिक तत्वांना पोलिसांनी आपल्या रडारवर घेतले असल्याचे उघड झाले आहे.त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेशान्वये कारवाई करत शहरातील दोन संशयित आरोपीबाबत माहिती मिळवली असल्याचे उघड झाले असून त्यांचेवर स्वतंत्रपणे धाड टाकली असता त्यातील हनुमाननगर 105 मध्ये अर्जुन राजू सोनवणे व विशाल संजय जगधने आदी दोन आरोपींकडे दोन तलवारी आढळून आल्या असून आहे.
कोपरगाव शहर आणि तालुका यांचे अवैध व्यवसायाबाबत घट्ट समीकरण जोडले गेले आहे.त्यामुळे अनेक वेळा आरोप करून ही बऱ्याच वेळा महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सातत्याने होत असतो.मागील आठवड्यात आ.आशुतोष काळे यांनी तर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे समोर या तक्रारींचा पाढा वाचला होता.व तालुका प्रशासन आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्याने आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केला होता.दरम्यान उद्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न होत आहे.दरम्यान शहरातील असामाजिक तत्वांनी कोणताही अनुचित प्रकार करून शांतता भंग करू नये यासाठी पोलिस प्रशासन चिंतेत असून त्यांनी उपद्रव मूल्य पोहचविणाऱ्या असामाजिक तत्वांना आपल्या रडारवर घेतले असल्याचे उघड झाले आहे.त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेशान्वये कारवाई करत शहरातील दोन संशयित आरोपीबाबत माहिती मिळवली असल्याचे उघड झाले असून त्यांचेवर स्वतंत्रपणे धाड टाकली असता त्यातील हनुमाननगर 105 मध्ये अर्जुन राजू सोनवणे व विशाल संजय जगधने आदी दोन आरोपींकडे दोन तलवारी आढळून आल्या असून आहे.

दरम्यान अवैध धंद्याबाबत नागरिकांच्या तक्रारी पाहून त्यांनी यांचे विरुद्ध आपले अस्त्रशस्त्रे बाहेर काढले असल्याचे आढळून आले आहे.त्यात राबवलेली मोहिमेत त्यांना या शिवाय अवैध जुगार प्रकरणी हर्षल सुरेश गवळी व किशोर शंकर दीक्षित आदी दोघांवर धाड टाकून पोलिसांनी त्यांचेकडून 03 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.तर या शिवाय गावठी दारू प्रकरणी प्रकरणी बाळासाहेब केशव आहेर,गोरख बळीराम पवार या दोघांवर कारवाई केली आहे.दरम्यान तीच बाब त्यांनी अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी त्यांनी कसून चौकशी करून सुभाषनगर भागातील आरोपी साहिल उमर कुरेशी,नदीम सलीम शेख आदी विरुद्ध कारवाई केली असल्याचे अवैध व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले आहे.या ऑल आऊट मोहिमेत पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,संदीप सोन्ने,संजय पवार,पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक रोकडे,बबन तमनर,किशोर जाधव,महेश तावरे,प्रवीण घुले,पोलिस कॉन्स्टेबल गणेश काकडे,श्रीकांत कुऱ्हाडे,बाळू धोंगडे,अण्णासाहेब थोरपिसे,आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



