जाहिरात-9423439946
भारतीय रेल्वे

पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यासाठी रेल्वे लाइन मंजूर-…या खासदारांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा आणि इंग्रज राजवटीत भूसंपादन झालेला मात्र गेली 125 वर्षे धूळखात पडलेल्या श्रीरामपूर(बेलापूर)-परळी रेल्वे लाईन प्रकल्पाला आपल्या पाठपुराव्यामुळे केन्द्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती शिर्डी लोकसंभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.

     

शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी (बेलापूर) श्रीरामपूर-परळी रेल्वे लाईन बाबत आतारांकित प्रश्न क्र 871 च्या माध्यमातुन  प्रश्न विचारला असता रेल सूचना व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे स्पष्ट केले.त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर परळी रेल्वे मार्ग बाबत प्रश्न उपस्थित केला असता रेल्वे मंत्री यांनी सध्याचे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी स्थानक या मंजुरी दिली असल्याचे सांगितले आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की,”सन-२०१२ साली बेलापूर-बीड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली या सर्वेक्षणासाठी जवळपास ०३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.या मार्गाचे सर्वेक्षण होऊन सर्वेक्षण अहवाल सन-२०१७ मध्ये केंद्रीय रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला होता; परंतु रेल्वे बोर्डाकडून न परवडणारा शेरा मिळाल्याने कुकाणा येथील कृती समितीने त्या विरोधात,”आमरण उपोषण” “आत्मदहन” असे आंदोलने केली होती.या आंदोलनामुळे बेलापूर परळी या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली या मार्गाचे सर्वेक्षण डिसेंबर-२०१८ मध्ये पूर्ण होऊन केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला होता; परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा अहवाल समीक्षेसाठी पुन्हा मुंबई कार्यालयात आला ही माहिती मिळताच माजी खा.वाकचौरे,कृती समितीचे रितेश भंडारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या अहवालाची तातडीने समीक्षा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता.त्यानंतर हा अहवाल रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने ई.डब्ल्यू./५४५/जी./पी.जी./व्ही.या जावक क्रमांकाच्या पत्राद्वारे ही माहिती माजी खा.वाकचौरे व रितेश भंडारी यांना देण्यात आली असल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी दिली होती.

भारतीय रेल्वे.

   दरम्यान मागील काही अधिवेशनात नवी दिल्ली येथे संसदेत खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी (बेलापूर) श्रीरामपूर-परळी रेल्वे लाईन बाबत आतारांकित प्रश्न क्र 871 च्या माध्यमातुन  प्रश्न विचारला असता रेल सूचना व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे स्पष्ट केले.त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर परळी रेल्वे मार्ग बाबत प्रश्न उपस्थित केला असता रेल्वे मंत्री यांनी सध्याचे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी स्थानक अंकीया,जालना तसेच परभणी मार्गांशी जोडलेले आहेत तसेच बिड मार्गे बेलापुर (श्रीरामपूर) आणि परळी वैजनाथ यांच्यात अतिरिक्त संपर्क प्रस्थापित करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे,अशी माहिती केन्द्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरात दिली आहे.याशिवाय महाराष्ट्र  राज्यात रेल्वे पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी खालीलप्रमाणे काम सुरु करण्यात आली आहेत.
अहिल्यानगर-बीड-परळी नवीन रेल्वे लाईन (२६१ किमी),बारामती-लोणंद (६४ किमी),इंदौर-मनमाड (३६० कि.मी.),जालना-जळगांव (१७४ कि.मी.),कल्याण-कसारा तिसरी लाईन (६८ कि.मी.),वर्धा-बल्लारशहा तिसरी लाईन (१३२ कि.मी.)राजनांदगांव-नागपूर तिसरी लाईन (२२८ कि.मी.),जळगांव-मनमाड चौथी लाईन (१६० कि.मी.),
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन लाईन (९५ कि.मी.),वर्धा-नदिड (२८४ कि.मी.),बडसा-गडचिरोली (५२ कि.मी.),दौंड-मनमाड दुहेरीकरण (२३६ कि.मी.),वर्षा-नागपूर तिसरी लाईन (७६ कि.मी.), इटारसी-नागपूर तिसरी लाईन (२८० कि.मी.),वर्धा-नागपूर चौथी लाईन (७९ कि.मी.),भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी लाईन (१३१ कि.मी.),महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ऐकून (५८हजार ९४२ कोटी) रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी या प्रकल्पांच्या अंमलबजावणी साठी भू-संपादन,वन विभाग परवानग्या,विविध विभागांची मान्यता,कायदा सुव्यवस्था,भौगालिक परिस्थिती आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेअभावी रखडत असल्याचेही केन्द्र सरकारच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.या सर्व प्रकल्पांचा पुनरावलोकन करुन स्पष्ट वेळापत्रक,पारदर्शक निधी वितरण आणि नियमित प्रगती अहवाल जनतेसमोर सादर करणे आवश्यक असल्याचे मतही शेवटी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close