जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर कोणी नेली,हे सातबाऱ्यावर दिसते-गंगूले

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
  वर्तमानात स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर नेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर ज्या ठिकाणी संभाव्य स्मार्ट सिटी होणार आहे त्या स्मार्ट सिटीच्या जागेचे उतारे कोपरगावकरांनी एकदा तपासून पहावे.त्या जागेच्या उताऱ्यावरची विवेक कोल्हे आणि पराग संधान यांची नावे पाहून कोपरगावकरच सांगतील स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर कोणी नेली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगत कोल्हेंचा हल्ला परतून लावला आहे.

कोपरगाव येथील एका प्रचार सभेत बोलताना शहराध्यक्ष सुनील गंगुले.

  

“राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या सभेत उपस्थित असणाऱ्या नागरीकांना आपण सात बारा उतारे देणार असल्याचे मंत्र्यांकडून वदवून घेतले असले तरी निळवंडेच्या पाण्याचे जे मृगजळ झाले तेच उताऱ्याच्या बाबतीतपण होणार आहे हे कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे.असल्याने हा फुसका बार ठरणार आहे”-सुनील गंगूले, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव.

   कोपरगाव शहरात निवडणूक आज शेवटच्या टप्पात आली असताना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या सभेत विवेक कोल्हे यांनी स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर नेल्याचा आरोप नुकताच एक प्रचार सभेत बोलताना केला होता.त्या आरोपाची शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कोपरगाव शहरातील कॉर्नर सभेत चांगलाच समाचार घेतला आहे.

  

कोपरगाव नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा का नाही? ते मी ठरवणार.तुम्ही जर नगरपालिका निवडणुकीत विरोधात काम केल्यास पाच वर्ष सत्ता माझीच राहील असा ईशारा देवून व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे दमबाजी करून धमकावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”निवडणुका आल्यावरच विरोधकांना विकास आठवतो.त्यामुळे आपल्या नेत्यांच्या सभा घ्यायच्या आणि लोकांना वेड्यात काढायचे काम विरोधकांनी आजवर केले आहे.त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा कोपरगावकरांना आली असून महसूल मंत्र्यांच्या सभेत असणाऱ्या नागरीकांना उतारे देणार असल्याचे महसूल मंत्र्यांकडून वदवून घेतले असले तरी ज्याप्रमाणे निळवंडेच्या पाण्याबाबत झाले तेच उताऱ्याच्या बाबतीतपण होणार आहे हे कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे.परंतु याच सभेत विरोधकांकडून स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर नेल्याचा हास्यास्पद व बिनबुडाचा आरोप करण्यात आला आहे.परंतु ज्यावेळी स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर गेली त्यावेळी आमदार तर स्नेहलता कोल्हे या होत्या व सरकारही त्यांचेच होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची सत्ता त्यावेळी आ.काळे यांच्याकडे नसतांना स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर ते कशी घेवून जावू शकतात ? त्यामुळे विरोधकांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत.मात्र स्वत:चा स्वार्थ साधायचा आणि पाप दुसऱ्यावर लोटून द्यायचे हे विरोधकांचे कारनामे पण जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी संभाव्य स्मार्ट सिटी होणार आहे त्याठिकाणच्या जागेचे उतारे कोणाच्या नावचे आहे हे पण पाहणे गरजेचे असून विरोधक किती खोटे बोलत आहे आणि जनतेची दिशाभूल करीत आहे हे उताऱ्यावरचे विवेक कोल्हे आणि पराग संधान यांची नावे पाहून कोपरगावकरांना आल्याशिवाय राहणार नाही.

  त्यामुळे अशा संधी साधू आणि विकासाला विरोध करणाऱ्या विरोधकांना कोपरगावचे सुज्ञ मतदार पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनिल गंगुले यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close