जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आधी पत्नीची हत्या,नंतर स्वतः केली आत्महत्या !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   आधी पत्नीची हत्या,नंतर स्वतः केली आत्महत्या !
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी दिलीप मिजगुले याने  अंगणवाडी सेविका असलेली आपली पत्नी स्वाती मिजगुले हिचा उशीने तोंड दाबून हत्या केली आहे.त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून सदर घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मयत महिला स्वाती मिजगुले.

  

मयत इसम दिलीप मिजगुले याने प्रथम अज्ञात कारणाने त्याने पत्नीला मारहाण केली त्यानंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली असल्याची माहिती समजत आहे.त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.याबाबतीत त्याने आपल्या घराच्या भितींवर काही मजकूर देखिल लिहला असून त्यात काही व्यक्तीची नावे लिहल्याचे सांगीतले जात आहे.

  स्वाती मिजगुले (वय- ५४ वर्ष) व दिलीप मिजगुले (वय-६०वर्ष ) असे मयत पती पत्नीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त  असे की,”आज शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी दिलीप मिजगुले याने प्रथम अज्ञात कारणाने त्याने पत्नीला मारहाण केली त्यानंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली असल्याची माहिती समजत आहे.त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.याबाबतीत त्याने आपल्या घराच्या भितींवर काही मजकूर देखिल लिहला असून त्यात काही व्यक्तीची नावे लिहल्याचे सांगीतले जात आहे.त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील चौकशी होऊन सत्य बाहेर येणार असल्याचे मानले जात आहे.

मयत महिलेचा पती दिलीप मिजगुले.

   दरम्यान तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.यावेळी शिर्डीत नुकताच पदभार घेतलेले शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
सदर पती पत्नीचे मृतदेह रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांच्या रुग्ण वाहिकेतुन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन
करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close