जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पंढरपूरच्या दिंडीत वारकऱ्यांचे निधन !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


संवत्सर ( वार्ताहर )


  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते पुंडलीकराव गोपाळा आगवन यांचे बुधवार दि. २५ जून  रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पायी दिंडीमध्ये अहिल्यानगरजवळ निधन झाले आहे.त्यांचे मृत्यू समयी ते ८२ वर्षाचे होते.

  

   कै.पुंडलीकराव आगवन हे गेल्या अनेक वर्षापासून विविध ठिकाणच्या दिंडीमध्ये सहभागी होत असत.यावर्षीही वयाच्या ८२ व्या वर्षी ते श्रीक्षेत्र धामोरी येथील श्री गोरक्षनाथ  पायी दिंडी सोहळ्यासाठी निघाले होते.वयाचा विचार करून घरच्यांनी व नातेवाईकांनी त्यांना यावर्षी दिंडीत जाऊ नका असा आग्रह केला होता.परंतु त्यांनी तो मान्य न करता पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला.दरम्यान प्रवास सुरू असताना अहिल्यानगरजवळ त्यांना अस्वस्थ वाटायला लागले.दुपारी २ वाजता त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   कै.पुंडलीकराव आगवन यांच्या मागे ज्ञानेश्वर व भाऊसाहेब ही दोन मुले व एक मुलगी,नातू,पणतू असा परिवार आहे.बुधवारी सायंकाळी संवत्सर येथील गोदावरी काठावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी परिसरातील मोठा जनसमुदाय व भक्तमंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close