जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

प्रा.गाढे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )


   कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरिजी महाराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.दत्तात्रय पुंजाजी गाढे यांच्या मातोश्री  सेवानिवृत्त व प्रा.शिला दत्तात्रय गाढे यांच्या सासूबाई गीताबाई पुंजाजी गाढे (वय-१०३वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,चार मुली,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.गीताबाई पूंजाजी गाढे.

स्व.गीताबाई गाढे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती परीसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.

   स्व.गीताबाई गाढे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती परीसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.आपली मुले मोठ्या कष्टाने उच्च शिक्षित बनवली होती.त्यांच्यावर कोपरगाव येथील नगरपरिषद अमरधाम येथे गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

   सदर प्रसंगी श्री सद्गुरू गांगागिरिजी महाराज महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक,विद्यार्थी,कोपरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाबद्दल कोपरगावचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष व आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता बिपीन कोल्हे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,संजय सातभाई,एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close