निवड
…या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड जाहीर

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव (धनगरवाडी)ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री बाजीराव डुंबरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यापूर्वीच्या सरपंच सिमा मधूकर घुले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली होती.त्यासाठी मंडळ अधिकारी एस.एस.काकड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले आहे.

“सिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव (धनगरवाडी) येथील सरपंच सिमा मधूकर घुले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली होती.त्या जागेवर जयश्री डुंबरे यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव (धनगरवाडी) येथील सरपंच सिमा मधूकर घुले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली होती.त्या जागेची निवड निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी जाहीर केली होती.या निवडणुकीत विहित वेळेमध्ये सरपंच पदासाठी जयश्री बाजीराव डुंबरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.यावेळी सिमा घुले यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली होती.या सुचनेस सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सर्वानुमते अनुमोदन देण्यात आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले आहे.

सदर प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच जयश्री डुंबरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सरपंच निवडीच्या निमित्ताने आयोजित ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपसरपंच नितीन देवगिरे,सिमा घुले,आर्चना माळी,हे सदस्य उपस्थित होते.सोसायटी अध्यक्ष माणिक डुंबरे,माजी सरपंच गोवर्धन शिंदे,भाऊसाहेब डुंबरे,मधूकर घुले,बाजीराव डुंबरे,संदीप डुंबरे,बाबासाहेब डुंबरे,रमेश डुंबरे,संजय डुंबरे,महेंद्र डुंबरे,शरद डुंबरे,सचिन घुले,गोरख माळी,रोहीदास घुले,सचिन गायकवाड,सागर डुंबरे,सागर वाघ,काळू माळी,रविंद्र डुंबरे,ग्रामसेवक योगेश पालखेडे,तलाठी बापू राठोड आदी उपस्थित होते.