जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बँड वाजविणाऱ्यांचा पोलिसांनी वाजवला बँड !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगावसह राज्यात वर्तमानात लग्नसराई जोरात सुरू आहे.लग्न,हळद,सूपारी असे कार्यक्रम जोरात सुरू आहे.त्यात डी.जे.आणि बँड यांच्या कर्णकर्कश आवाजांनी अनेकांना जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना बहिरेपणा येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर आलेले असताना या वीणा परवानगी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या लक्ष्मण दौलत सोनवणे (वय -३५) रा.शिरजगाव तालुका येवला या बँड पथकाचे विरुध्द प्रथमच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल झाल्याने अवैध बँड आणि  डी.जे.वाजविणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.तर नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे अभिनंदन केले आहे.

   

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अधीन ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायदा २००० नुसार अनेक बंधने टाकण्यात आली.४५ ते ६५ डेसिबल एवढ्या आवाजाची मर्यादा असताना आज ही १०० डेसिबलपर्यंत पोहोचली आहे.याबाबत पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे अधिकार मिळाले आहे त्यांची पहिल्यांदा अंमलबजावणी झाल्याने त्याचे कोपरगाव येथील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

  मिरवणूक,रॅली,जुलूस काहीही असो,कर्णकर्कश आवाजात वाजणारे डी.जे.आणि त्या तालावर अगदी त्याच्या समोर थिरकणारी तरुणाई आज सहज पाहायला मिळते.नॉईज पोलुशन डी.जे.मुळे सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येत असल्यानेच ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी कायदा झाला.पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अधीन ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायदा २००० नुसार अनेक बंधने टाकण्यात आली.४५ ते ६५ डेसिबल एवढ्या आवाजाची मर्यादा असताना आज ही १०० डेसिबलपर्यंत पोहोचली आहे.याबाबत पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे अधिकार मिळाले.मात्र,कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होऊन आवाजाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत नाही.वर्तमानात डी.जे.चा वाढलेला आवाज आणि डोळे दीपविणारे प्रकाशाचे झोत आज सामाजिक समस्या म्हणून उदयास येत आहे.सोबतच व्यक्तिगत संकटही ओढवून घेण्याचे काम हे घटक करीत आहोत.

  

दरम्यान एका माहितीनुसार सदर मंगल कार्यालयानजीक एक प्रसिध्द हॉटेल असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक असतात मात्र सदर ठिकाणी लग्न आणि अन्य काही कार्यक्रम असला की त्या ठिकाणी असलेल्या डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजाने त्या हॉटेल मध्ये ग्राहकांना बसणे कठीण होते.त्याचा प्रतिकूल परिणाम त्या हॉटेल व्यावसायिकावर होत असल्याने त्यातून हा गुन्हा दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

   आवाजाचे प्रदूषण ही गंभीर प्रकरण म्हणून आज उदयाला येत आहे.आनंद साजरा करायलाच हवा; मात्र आनंदाचे पर्यवसान दु:खाच्या घटनेत होऊ नये,याची काळजीही आपल्याला घ्यावी लागणार नाही असे समजून चालणार नाही.ज्या धार्मिक भावनेतून उत्सव साजरे करायचे,ती भावना जिवंत असल्याचे दाखविण्याची वेळ आता आली आहे.कारण आम्हाला जर विसर पडला तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी असलेली पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा तेवढी सजग हवी; मात्र ती कधीच आणि कुठेच दिसत नाही.निघणारे जुलूस,जयंतीच्या मिरवणुकांना पोलिसांचे संरक्षण असते.मात्र ते तक्रार केल्यावर जागृत होत असल्याचे वारंवार दिसत आहे.तुम्ही तक्रार करा मग आम्ही कारवाई करू अशी स्थिती असताना कोपरगाव शहरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अपवाद ठरले असल्याचे दिसून आले आहे.या प्रकरणी त्यांनी नुकताच कोपरगाव तालुक्यात पहिलाच गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पोलिस अधिकारी भगवान मथुरे आणि त्यांचे सहकाऱ्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

    यातील येवला तालुक्यातील आरोपी लक्ष्मण दौलत सोनवणे यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिस कॉ.श्रीकांत बाळू कुऱ्हाडे (वय-३५) यांनी गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,’ दिनाक २४ मे रोजी दुपारी १२.३० वाजेचे सुमारास आरोपी यांनी कोपरगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यानजिक असलेल्या ‘कलश ‘मंगल कार्यालयात वीणा परवानगी आपल्या ताब्यातील महालक्ष्मी बँड नावाचे साहित्य घेऊन लोकसेवक यांचे आदेशाचा अवमान करून वाजवताना आढळून आले आहे.

    या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-२६३/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम २२३ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांनी भेट दिली आसून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पो.हे.कॉ.बी.एच.तमनर हे करीत आहेत.

   दरम्यान एका माहितीनुसार सदर मंगल कार्यालयानजीक एक प्रसिध्द हॉटेल असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक असतात त्या ठिकाणी लग्न आणि अन्य काही कार्यक्रम असला की त्या ठिकाणी असलेल्या डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजाने त्या हॉटेल मध्ये ग्राहकांना बसणे कठीण होते.त्याचा प्रतिकूल परिणाम त्या हॉटेल व्यावसायिकावर होत असल्याने त्याने अनेक वेळा तक्रारी केल्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्यातून हा गुन्हा दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.काही का असेना पण याची चांगली सुरुवात मात्र नक्की झाली आहे.परिणामी अन्य नागरिक अशा तक्रारी करण्यास धजावणार आहे परिणामी ध्वनी प्रदुषण कमी होण्यास आगामी काळात मोठी मदत होणार आहे ही मोठी समाधानाची बाब मानली जात आहे.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी डी.जे.आणि बँड सोबतच डी.जे.लेसरवरही बंदी आणण्याची व कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close