निधन वार्ता
दिनेश दिंडे यांचे निधन

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर येथील श्री शृंगेश्वर उपबाजार कांदा मार्केटचे सचिव व ज्येष्ठ कार्यकर्ते दिनेश मधुकर दिंडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ५८ वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारात कै.दिनेश दिंडे यांनाही धार्मिक कार्याची आवड निर्माण झाली होती.संवत्सर गांवातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.संवत्सर येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री शृंगेश्वर महाराज मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कै.दिंडे यांनी मोठे परिश्रम घेतले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै.दिनेश दिंडे हे अल्प आजाराने त्रस्त होते.त्यांच्यावर कोपरगांव व नाशिक येथे उपचार करण्यात आलेत परंतु काही सुधारणा होत नसल्याने अहिल्यानगर येथील विळद घाटातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते परंतु आजार अधिक बळावल्याने अखेर शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले.दूध उत्पादकांचे नेते स्व.नामदेवराव परजणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून विविध कार्यात त्यांचा अग्रणी सहभाग असायचा.त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांच्यासोबत त्यांनी सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक कार्यात सहभाग घेतला.कोपरगांव तालुका ऑटोरिक्षा सेनेचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते.सध्या संवत्सर येथील श्री शृंगेश्वर उपबाजार कांदा मार्केटमध्ये सचिव म्हणून ते काम पाहत होते.
त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारात कै.दिनेश दिंडे यांनाही धार्मिक कार्याची आवड निर्माण झाली होती.संवत्सर गांवातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.संवत्सर येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री शृंगेश्वर महाराज मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कै.दिंडे यांनी मोठे परिश्रम घेतले होते.रमेशगिरीजी महाराज यांचे निस्सीम भक्त म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती.दिंडे काका म्हणून ते सर्वत्र परिचित होते.
कै.दिंडे यांच्यामागे पुणे येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ बंधू व एक भगिनी असा परिवार आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर दुपारी अंत्संस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.अंत्यविधीच्यावेळी अनेकांनी श्रध्दांजली वाहून कै.दिंडे यांच्याप्रती दुःखद भावना व्यक्त केल्यात.