कोपरगाव तालुका
कोपरगावातील त्या चौदा जणांचे अहवाल नकारात्मक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील एका साथ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण आढळल्या नंतर त्या भागातील या रुग्णांशी संबंधित जवळपास सतरा जणांना आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगर येथील ग्रामीण रुग्णालायत पाठवले होते व त्यांच्या स्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते त्यातील दहा जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते नकारात्मक आले असून अद्याप सात जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कोपरगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.उशिराने मिळालेल्या माहितीनुसार आणखी चार अहवाल प्राप्त झाला असून तेही नकारात्मक आले आहे.
रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास अठरा जण रात्रीच ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती.त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती.त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून यातील दहा जणांचे व नंतर आणखी चार असे चौदा जणांचे अहवाल नकारात्मक आले आहे.
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे होते त्यांनी त्या रात्रीच लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर व धारणगाव रस्त्यानजीकचा परिसर सील केला होता. या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास अठरा जण रात्रीच ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती.त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती.त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून यातील दहा जणांचे व उशिराने अजून चार असे चौदा जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.त्यातील एका रुग्णास आत्मा मलिक हॉस्पिटल येथे देखभालीत ठेवले असल्याची ताजी माहिती देऊन उर्वरित अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांनी दिली आहे.