गुन्हे विषयक
तरुणाची आत्महत्या,पोलिसांत नोंद दाखल !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या जुना निवारा येथे रहिवासी असलेला तरुण दिपक लक्ष्मण लोखंडे (वय-२७) याने काल दुपारी १.१५ वाजता आपल्या राहत्या घरी छतास असलेल्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या प्रकरणी मयताचा भाऊ अमोल लक्ष्मण लोखंडे (वय-३६) याने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्यामुळे कोपरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्यातरुणास तातडीने उपचारार्थ दखल केले होते.मात्र तो उपचाराआधीच मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.या प्रकरणी काही नाजूक कारण असल्याची नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत इसम हा टाकळी येथील रहिवासी असून तो कोपरगाव जुन्या निवारा येथे काही दिवसापूर्वी किरकोळ वादातून घर सोडून राहण्यास आला होता.मात्र काही दिवसापासून तो अत्यवस्थ होता.त्याने काल अज्ञात कारणाने काल दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरात घराच्या छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.घटना घडल्यानंतर नजीकच्या नागरिकांनी त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्यास तातडीने उपचारार्थ दखल केले होते.मात्र तो उपचाराआधीच मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे.या प्रकरणी काही नाजूक कारण असल्याची नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ९०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.