जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

बोरीच्या झाडाची संगत !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -( नानासाहेब जवरे )
 

    महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे.तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे.त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणूक एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात.एकंदरित राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात विधासभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या राजकीय पार्श्वभूमीवर कोपरगाव ही राजकीय नेत्यांची अवस्था विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी नाही झाली तर नवल ! वर्तमानात ईशान्य गडावरील नेत्याने आपल्या हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांना तूर्त थांबा,पहा, जा ! आदेश दिले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) गटा विरुद्ध शरद पवारांची तुतारी वाजण्याची जास्त शक्यता व्यक्त होत आहे.


  

आगामी काळात आपण कोणत्या पक्षात जायचे इथे (कोपरगाव विधासभा निवडणुकीत )नेमकी कोणाची लढाई होणार याचा अद्याप कोणालाही थांगपत्ता लागत नाहीये.कारण सत्ताधारी गटाचा नेता थेट तुतारी घेण्यासाठी व्याकूळ असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी थेट तुतारीच्या नेत्यांची पुण्यात अन्य दोन कार्यकर्त्यांना घेऊन भेट घेतली असून त्यात त्यांना मात्र सपशेल अपयश आले आहे.

लोकसभा निवडणुकी पाठोपाठ आता देशातील चार महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.महाराष्ट्र,झारखंड,हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते.त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे.निवडणूक आयोगाने राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे.अशातच कोपरगाव तालुक्यात मोठे राजकीय रणकंदन होणार हे उघड आहे.त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहे.त्यांनी शहर आणि तालुक्यातील सर्वच संघटना आणि त्यांचे जातीनिहाय नेते आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्यासाठी हात मोकळा सोडला आहे.त्यातच भरीला मोठे वाढदिवस,गंगा आरत्या सह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू सामाजिक सेवेचे अवसान आणण्यास पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे.कालबाह्य योजना निवडणूकपूर्व सुरू करून आपले उत्तर दायित्व सिद्ध करतांना दिसत आहे.गोदावरी कालव्यांच्या बाबतचा कळवळा तर खूपच दाटून आलेला दिसत आहे.शहरातील कार्यकर्ते आणि पुढारी यांचे वाढदिवस यांची आवर्जून दखल घेतली जाताना दिसत आहे.कोपरगाव शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी प्रस्तावित पाण्याचा तलाव देखरेखीसाठी अहमिका लागली आहे.रस्ते व त्यांची दुरवस्था याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.एकूणच तालुक्यात लोकसभेनंतर रामराज्य अवतरल्याचा भास होत आहे.

सत्ताधारी गटास नाकारल्याने कोपरगावच्या विरोधी गटाच्या कानात वारे शिरले असून यांनी गायीच्या नवट वासरासारखे शेपूट वर करून मोठा ठणका मारून त्यांनी थेट तूतारीच्या नेत्यांना गाठले असून त्यांनी राजधानीत तब्बल तीन दिवस ठाण मांडले होते.आपला तुमच्यावर राग नाही हे दाखविण्यासाठी आपणही त्यांच्या पक्षास पायघड्या घालण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.नव्हे ते जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.त्यासाठी अल्पसंख्याक मतांवर त्यांचा डोळा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

दरम्यान एकीकडे ही बाजू सांभाळताना आगामी काळात आपला पक्ष व झेंडा नेमका कोणता याकडेही जातीने लक्ष जाताना दिसत आहे.त्यासाठी मागील काळात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे आटोकाट प्रयत्न होताना दिसत असून वरिष्ठ राजकीय नेत्यांना पायघड्या टाकताना दिसत आहे.ते कमी की काय राजकीय सोयीसाठी सर्वच पक्ष आणि त्यातील जातीनिहाय समित्यात सर्वच कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व कसे मिळेल याकडे हमखास लक्ष दिले जात आहे.आगामी काळात दादांचे आणि भैयांचे आपल्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून कार्यकर्ते दादा पुतांचे बॅनर त्यांच्या डोळ्यासमोर कसे झळकतील याची विशेष काळजी घेत आहे.त्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना सपशेल दुर्लक्ष करण्याचे फर्मान सोडले असल्याचा संशय व्यक्त होत असून शहरातील सर्वच गल्ली बोळात पेव्हर ब्लॉक बसण्याची सोय करून नागरिकांना हे शहर महानगर असल्याचे भासविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे.पेव्हर ब्लॉकच्या कामात काम कमी आणि मलिदा जास्त असल्याने शहर आणि तालुक्यात सर्वत्र,’पेव्हर युग’ अवतरले आहे.शहर आणि तालुक्यातील विकास कामाचा ठेका देताना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना 05 तर शहर आणि तालुक्यातील अन्य ठेकेदार आदींना 10 टक्के (निवडणूक) पक्ष निधी म्हणून विशेष टोल आकारला जात आहे.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहे त्या ठिकाणी पेव्हर लॉक बसवायचा भीम पराक्रम शहरातील अधिकारी आणि नेते करताना दिसत आहे.हे कमी की काय निवडणुकीत पैशाची कमतरता नको म्हणून जी कामे केली नाही त्यांची बिले काढण्याचे मागील पंचवार्षिक काळात झालेले पराक्रम या काळात नोंदवले नव्हे मोडले जात आहे.मागील माजी लोकप्रतिनिधींचे सर्व रेकॉर्ड तोडून मोडून फेकले जात आहे.त्यासाठी माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी त्याचा निवडणूकपूर्व तपशील बाहेर काढला असून तो पुरावा दिला आहे.जातनिहाय कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर नेमणूका करून आपण किती धर्मसहिष्णू आहे हे आवर्जून दाखवले जात आहे.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आदींना आपल्या कार्यकर्त्यांना कोणतेही गुन्हे करा त्यांना अभय देण्याचे फर्मान आतिरिक्त पुरवले जात असल्याचा मोठा संशय आहे.तरीही काही (अ)सामाजिक तत्वांना कोट्यवधीचा निधी देऊनही त्यांनी आपला; हिसका सत्ताधाऱ्यांना दाखवला आहेच.व “आगे आगे देखो होता है क्या ? अशी खास चुणूक त्यांनी दाखवून दिली आहे.त्यामुळे त्यांच्या मतांसाठी व्याकूळ असलेल्या सत्ताधारी नेत्यांची अवस्था ही थोड्या पाण्यातील मासुळ्या सारखी व्याकूळ झाली आहे असो !

  

      कोपरगाव शहरातील सर्वच गल्ली बोळात पेव्हर ब्लॉक बसण्याची सोय करून नागरिकांना हे शहर महानगर असल्याचे भासविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे.पेव्हर ब्लॉकच्या कामात काम कमी आणि मलिदा जास्त असल्याने शहर आणि तालुक्यात सर्वत्र,’पेव्हर युग’ अवतरले आहे.शहर आणि तालुक्यातील विकास कामाचा ठेका देताना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना 05 तर शहर आणि तालुक्यातील अन्य ठेकेदार आदींना 10 टक्के (निवडणूक) पक्ष निधी म्हणून विशेष टोल आकारला जात आहे.

दरम्यान आगामी काळात आपण कोणत्या पक्षात जायचे इथे (कोपरगाव विधासभा निवडणुकीत )नेमकी कोणाची लढाई होणार याचा अद्याप कोणालाही थांगपत्ता लागत नाहीये.कारण सत्ताधारी गटाचा नेता थेट तुतारी घेण्यासाठी व्याकूळ असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी थेट तुतारीच्या नेत्यांची पुण्यात अन्य दोन कार्यकर्त्यांना घेऊन भेट घेतली असून त्यात त्यांना मात्र सपशेल अपयश आले आहे.कारण त्यात वरिष्ठ नेत्याने त्यांना केवळ दोन मिनिट वेळ देऊन त्यांची रवागणी बाहेर केली आहे.नव्हे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.कारण आपल्यापेक्षा यांनी पुतण्यावर जास्त प्रेम केल्याचा त्यांचा दावा आहे.त्यामुळे विरोधी गटाच्या कानात वारे शिरले असून यांनी गायीच्या नवट वासरासारखे शेपूट वर करून मोठा ठणका मारून त्यांनी थेट तूतारीच्या नेत्यांना गाठले असून त्यांनी राजधानीत तब्बल तीन दिवस ठाण मांडले होते.आपला तुमच्यावर राग नाही हे दाखविण्यासाठी आपणही त्यांच्या पक्षास पायघड्या घालण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.नव्हे ते जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.त्यांचा अल्पसंख्याक मतांवर डोळा असून त्यांची व शिवसेनेच्या मतांची बेरीज जुळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.(इकडे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी कितीही दंडाच्या बेटकुळ्या फुग्वल्या तरीही) सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना (अर्थदृष्ट्या) हाताळणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ समजला जात आहे.त्यामुळे त्यांनी इकडे कमळवांल्यांना झुलवत ठेवले आहे.नव्हे अद्याप त्यांचे दगडाखाली बोटे गुंतली असल्याने पर्याय नाही ही त्यांची दुखरी नस बनली आहे.(साखर कारखान्याची कर्ज हमी त्यांचमुळे नाकारली होती हे येथे दखलपात्र समजले जात आहे)मात्र त्यांनी कमळ वाल्या नेत्यांना कुर्निसात करून व त्यासाठी तुतारीवाल्या नेत्यांची मदत व त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचे घरी पायधूळ झाडून घेऊन तूर्त तरी आपले दगडाखालची बोटे सोडवून घेतली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे सर्वच थड्यांवर हात ठेवण्याचे कसब त्यांनी साध्य केले असल्याचे मानले जात असून शेवटी मर्त्यांना अमृताचा लाभ म्हणायचं दुसरे काय !कोपरगाव तालुक्याच्या राजकारणाचा शुशू वर्ग झाला असून इकडे तालुक्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची अवस्था ही नेत्यांच्या मागे फिरणे म्हणजे पिंपळाच्या वृक्षास पाणी घालण्याचे काम सुरू असून त्यास फळ येण्याची वाट पाहिल्यासारखे बनले आहे.त्यामुळे शेतीचे वाळवंट झाले असले  तरी ही मंडळी निवडणुकीच्या नौबती झडू लागताच हे आगामी काळात घुमावयास लागणारआहे हे वेगळे सांगायची गरज नाही.हे गेली सात दशकांचे चित्र आहे.चांगल्या,चारित्र्यवान कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणे ही कोपरगावकरांची खासियत.परिणामी बोरीचे झाडाचे जवळ गेले असता वस्त्र अडकवून गुंतविते ते वस्त्र ओढून काढू लागल्यास अंगास काटे ओरखडतात,फळे खावू जाता घसा पोळून निघतो अशी या तालुक्यातील कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची स्थिती असो !

आपल्या प्रतिक्रिया ‘न्युजसेवा’च्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा..9423 43 9946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close