कामगार जगत
…. या संस्थेत अनुकंपा तत्वावर कर्मचारी नेमणुका प्रदान – माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी )
श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ च्या पुर्वसंधेला श्री साईबाबा संस्थान मध्ये सन २०१४ पासून अनुकंपा प्रतिक्षासुचीवर असलेल्या अनुकंपा उमेदवारांना दि.०१ सप्टेंबर २०२० ते दि.३१डिसेंबर २०२३ अखेर रिक्त झालेल्या पदाच्या १० टक्के पदानुसार गट क चे ०८ व गट ड चे १७ असे एकूण २५ पदांवर प्रतिक्षासुचीचे प्रथम प्राधान्य क्रमानुसार अनुकंपा तत्वावर नेमणूका संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते देण्यात आल्या आहेत.
यामध्ये गट क चे एकूण ०८ पदांत आचारी – ०१ ,लिपीक-टंकलेखक –०५ व तारतंत्री –०२ यांचा समावेश असून गट ड च्या एकूण १७ पदांत मदतनीस – १० व सफाई कामगार – ०७ यांचा समावेश आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमणूका दिलेल्या कर्मचा-यांना श्री साईबाबांची सेवा प्रमाणिक पणे करणेच्या व नेमून दिेलेली कामे जबाबदारीने पार पाडणेच्या सुचना दिल्या आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे,मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.अधिक्षक रामदास कोकणे,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते.