कोपरगाव तालुका
…या महिलांच्या खात्यावर होणार रक्कम जमा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रधानमंत्री जन-धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर चालू एप्रिल व पुढील मे आणि जुन या तीन महिन्यात प्रति महिना रुपये ५०० इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम २ एप्रिल २०२० रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस एका प्रसिद्धी पत्रकांन्वये दिली आहे.
दरम्यान मोदी सरकारने २० कोटींची तरतूद करून आर्थिक दुर्बल घटका तील ज्या महिलांनी प्रधानमंत्री जण-धन योजनेत आपली खाती उघडली आहेत अशा महिलांच्या या साठीच्या काळात गरजा लक्षात घेऊन त्याना २ हजार रुपये देण्याचा दिलासा दायक निर्णय घेतला आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.देशात २६३९ रुग्ण आणि ५६ बळी आहेत. मागील २४ तासांत १५२ जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. दरम्यान मोदी सरकारने २० कोटींची तरतूद करून आर्थिक दुर्बल घटका तील ज्या महिलांनी प्रधानमंत्री जण-धन योजनेत आपली खाती उघडली आहेत अशा महिलांच्या या साठीच्या काळात गरजा लक्षात घेऊन त्यानां दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्य्याने दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ ( कोरोना) साथीमुळे बँक शाखांमध्ये व ग्राहक सेवा केंद्र मधे गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे.दिवस पहिला ३ एप्रिल ज्या खाते क्रमांकांचा शेवट ० किंवा १ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दुसरा दिवस ४ एप्रिल खाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.५ तारखेला रविवार आणि ६ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.दिवस तिसरा ७ एप्रिल ज्या खाते क्रमांकांचा शेवट ४ किंवा ५ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस चौथा ८ एप्रिल ज्या खाते क्रमांकांचा शेवट ६ किंवा ७ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस पाचवा ९ एप्रिल ज्या खाते क्रमांकांचा शेवट ८ किंवा ९ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.तरी आपला खाते क्रमांक चेक करून त्या-त्या दिवशी जावे अन्यथा गर्दि करु नये
जर गरज असेल तरच जावे अन्यथा जाऊ नये असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी केले आहे.