कोपरगाव तालुका
रेशनच्या मालाला फुटले पाय,चोराच्याच हाती तिजोरीची चाव्या ?
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/04/download-14-1.jpeg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रातिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गरीब नागरिकांचा शिधा पळविणाऱ्या एका टोळीचा कोपरगावचे धाडसी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पर्दापाश करण्यात यश मिळाले असून त्यांच्याकडून तांदळाच्या ४१ गोण्या व ३९ रिकाम्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून त्यात सामील विनोद पंडित दुकळे,हनुमाननगर,चंद्रशेखर त्रिंबक जाधव, येवला रोड,कैलास दादासाहेब बोरावके,बैल बाजार रोड,अन्वर आजम शेख,लक्ष्मीनगर आदी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हा माल कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी साईबाबा तपोभूमी ट्रस्टच्या वतीने भरलेल्या रकमेतून जो धनादेश ज्याच्या हातात देण्यात आला होता तो हाच कैलास बोरावके असल्याने चोराच्याच हातात तिजोरीची चाव्या गेल्याचे बोलले जात आहे. हा शिधा अंत्योदय योजनेतील नागरिकांना मोफत वाटण्यात येणार होता तोच असल्याने अनेकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
हेच ते आ. काळे व तहसीलदार चंद्रे यांनी धनादेश दिल्याचे छाया चित्र मध्ये आरोपी धनादेश स्वीकारताना
कोपरगाव शहरातील नागरिकांचा शिधा काही रेशन दुकानदार अनेक वर्षांपासून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीतून लंपास करीत आहेत.त्यांनी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत आपल्या सहकाऱ्या समवेत धड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी रेशन दुकानात विक्रीसाठी देण्यात आलेल्या तांदळाच्या ४१ गोण्या व रिकाम्या ३९ गोण्या सप्रमाण मिळून आल्याने त्यांनी स्थळ पंचनामा करून आरोपी विनोद दुकळे, चंद्रशेखर जाधव, रेशन दुकान संघटनेचा अध्यक्ष कैलास बोरावके,त्यास साहाय्य करणारा अन्वर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमुख आरोपी कैलास बोरावकेव चंद्रशेखर जाधव मात्र फरार झाले आहेत.यात पूर्वी पासून मोठे राजकीय रॅकेट सामील असल्याची खात्रीलायक माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.
संपूर्ण जगासह देश व राज्यात जीवघेण्या कोरोना विधान ने धुमाकूळ घातला आहे. इतर प्रगत देशांची कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करतांना जी धांदल उडाली अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत सम्पूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबावर उपासमारीची वेळ टाळण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय योजनेतील कुटुंबांना शिधा पत्रिकेवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता व कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमी यांच्या वतीने ६ लाख ८३ हजार रुपयांचा धनादेश रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके यांच्याकडे सुपूर्द केला आहे.विशेष म्हणजे ज्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला त्या रेशन संघटनेच्या अध्यक्षानेच हा डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात अनेक रेशन दुकानदार गरीब व आर्थिक दुर्बल घटकांचा माल स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत.त्यांना राजकीय अभय असल्याचे बोलले जात आहे.याची कुणकुण कोपरगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांना मिळाली होती.त्यांनी याबाबत काही आठवड्यापूर्वी या ठिकाणी धाड टाकली होती मात्र त्यावेळी त्यांना पुरावा मिळाला नव्हता.त्यामुळे रिकाम्या हातानी परतावे लागले होते.दरम्यान त्यांना एक्का खबऱ्यामार्फत नुकतीच खबर लागली होती की,कोपरगाव शहरातील नागरिकांचा शिधा काही रेशन दुकानदार अनेक वर्षांपासून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीतून लंपास करीत आहेत.त्यांनी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत आपल्या सहकाऱ्या समवेत धड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी रेशन दुकानात विक्रीसाठी देण्यात आलेल्या तांदळाच्या ४१ गोण्या व रिकाम्या ३९ गोण्या सप्रमाण मिळून आल्याने त्यांनी स्थळ पंचनामा करून आरोपी विनोद दुकळे, चंद्रशेखर जाधव, रेशन दुकान संघटनेचा अध्यक्ष कैलास बोरावके,त्यास साहाय्य करणारा अन्वर शेख यांच्या विरुद्ध पुरवठा अधिकारी तथा सचिन अशोकराव बिंनोड, यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.न.१२४/२०२० अत्यावश्यक वस्तू अधिनियम ३ व ७ ,आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५६ व भा.द.वि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगावचे तहसीलदार ययोगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.