आरोग्य
..या कारखान्याच्या संचालकास बदडले ! अन्य तिघांवर गुन्हे दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोरोना विषाणूच्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानकासमोर संचारबंदीचा उल्लंघन केल्या प्रकरणी कोपरगाव नजीक असलेल्या एका सहकारी साखर कारखान्याच्या खिर्डी गणेश येथील रहिवाशी असलेल्या संचालकास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी काठीने चांगलेच बदडले असल्याचा व्हिडीओ सामाजिक संकेत स्थळावर प्रसारित झाल्याने नागरिकांत तो चर्चेचा व भीतीचा विषय ठरला आहे.या खेरीज आज कोपरगाव पोलिसानी आज कडक भूमिका घेत अन्य अतिष सतीश शिंदे (वय-२६),रा,येवला रोड,सुनील भवानी निकम (वय-४०) रा.स्टेशन रोड,गुफरान अय्यूब इनामदार (२६),राजू रमजान पठाण (वय-२४)दोघे रा.संजयनगर या चौघांविरुद्ध भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१ प्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी आपली भूमिका सर्वपक्षीय बैठकीनंतर बदलली आहे.जनतेला प्रशासनाने समजावून सांगूनही अपेक्षित बदल घडत नसल्याने पुढील संकट टाळण्यासाठी आपली भूमिका नाईलाजाने बदलावी लागली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पोलिसांची वक्रदृष्टी बेताल वागणाऱ्या नागरिकांवर पडली असून जे विनाकारण शहरात अन्य नागरिकांना धोका निर्माण करत आहे.त्यांना आपला हिसका दाखविण्यास प्रारंभ केला आहे.
कोपरगाव शहरात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय हद्दीत बाहेरगावातून आलेल्या नागरिकांची गत दोन दिवसात १ हजार २९६ इतकी वाढ झाली असून आता आज अखेर बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ५ हजार ८८३ इतकी झाली आहे.त्यात परदेशातून आलेल्या ७७ तर राज्याबाहेरून आलेल्या १३१ नागरिकांचा समावेश आहे.आकडेवारी पुढील प्रमाणे जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ५४१५,तर तालुक्याबाहेरून आलेल्या २६० नागरिकांचा समावेश आहे.आता एकूण कोरोंटाईंनचे शिक्के मारलेले नागरिक ५८८३ असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यातच दिल्लीतील निजामोद्दीन येथील जमातीचा प्रताप समोर आल्याने व त्यात नगर जिल्ह्यातील नागरिक असल्याची माहिती समोर आल्याने प्रशासन तणावात आले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसानी आपली भूमिका सर्वपक्षीय बैठकीनंतर बदलली आहे.जनतेला प्रशासनाने समजावून सांगूनही अपेक्षित बदल घडत नसल्याने पुढील संकट टाळण्यासाठी आपली भूमिका नाईलाजाने बदलावी लागली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पोलिसांची वक्रदृष्टी बेताल वागणाऱ्या नागरिकांवर पडली असून जे विनाकारण शहरात अन्य नागरिकांना धोका निर्माण करत आहे.त्यांना आपला हिसका दाखविण्यास प्रारंभ केला आहे.त्यातच सायंकाळी चारच्या सुमारास खिर्डी गणेश येथील रहिवाशी असलेले व कोपरगाव नजीक असलेल्या ईशान्य गडावरील संचालक असलेले संचालक नेमकं तोंडाला रुमाल बांधून आपल्या हिरो पॅशन या लाल रंगाच्या दुचाकीवरून शहरात प्रवेश करत असताना त्याना हा प्रसाद मिळाला आहे.तर अन्य चौघांवर पोलिसानी गुन्हे दाखल केला आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पुढे तीन दिवसच अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता नागरिकांना अन्यवेळी बाहेर पडणे महाग पडणार आहे.