आरोग्य
…या वकिलांनी केले गरजूंना शिधा वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना अनेक शहरे लोक डाऊन करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने आर्थिक दुर्बल घटकाना आपल्या जीवनाचा संघर्ष करताना मेटाकुटीस येण्याचा प्रसंग गुदरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित काळे यांनी खंडपीठात कॅन्टीन मधील कामगारांचे या स्थितीत काम बंद झाल्याने आपला उदरनिर्वाह करणे अशक्य बनल्याने त्यांना आधार देण्यासाठी व जीवन सुसह्य होण्यासाठी शिधा वाटप केल्याने त्यांच्या या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे.या स्थितीत ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे त्यांची काळजी सरकार करीत असले तरी सरकारचे हात सर्वत्र पोहचतातच असे नाही.अशा प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अहंम ठरत असते.
देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे.या स्थितीत ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे त्यांची काळजी सरकार करीत असले तरी सरकारचे हात सर्वत्र पोहचतातच असे नाही.
हि बाब हेरून प्रदेश युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांनी मात्र उच्च न्यायालयाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या मात्र वर्तमानात शहर लॉकडाऊन मध्ये ज्यांचा रोजमुला हरवला आहे.याची रास्त दखल घेऊन त्यांना गहू व तत्सम शिधा देऊन त्यांचे जगणे सुसह्य करण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,अड्.वैभव देशमुख,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले, जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,नानासाहेब गाढवे,विठ्ठलराव पोकळे,उत्तमराव जोंधळे,रमेश दिघे,गंगाधर रहाणे,रंगनाथ गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,दत्तात्रय शिंदे (गुरुजी),तानाजी शिंदे (सर),अशोक गांडूळे,कौसर सय्यद, ढमाले सर आदींनी कौतुक केले आहे.