आरोग्य
…या गावात केली जंतुनाशक फवारणी

संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूने कहर वाढवलेला असताना त्याला नियंत्रणात आणण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाय करण्यांतर्गत गावात जंतुनाशक फवारणी सरपंच प्रशांत घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूकतीच केली आहे.
देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत.काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.
देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे.या साठीच्या रोगावर मत करणे आवश्यक बनले आहे.त्यासाठी सामाजिक अंतर राखणे व गाव स्वच्छ ठेवणे,गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे.हि गरज ओळखून कुंभारी ग्रामपंचायतीने नुकतीच जंतुनाशक फवारणी करण्यास प्रारंभ केला आहे.कुंभारी गावामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय योजना जनजागृती साठी गाव समितीने जनजागृती केली आहे. गावात जंतुनाशक फवारणी कलम १४४ च्या अनुषंगाने ग्रामस्थ एकत्र जमू नये यासाठी संपूर्ण गावात फिरून भोंग्याद्वारे सूचना देण्यात आली यावेळी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ग्रामस्थांनी रुमाल तोंडाला बांधण्यासाठी वापरावा त्याचबरोबर किंवा सॅनीटायझर साबण साधनाचा उपयोग करून दिवसभर हात धुवावे. आपण स्वतः आपला रक्षक आहे या भावनेतून काम करावं तसेच रेशन दुकान, किराणा दुकान मेडिकल विविध ठिकाणी गर्दी होऊ नये. या उद्देशाने सामाजिक अंतर किमान एक मीटर ठेवावे.या मोहिमेमध्ये सक्रिय देणे त्या समितीचे सचिव पोलीस पाटील उल्हास मेढे, ग्रामसेवक संजय डवले, कृषी सहाय्यक निलेश बिबवे, तलाठी सुनील साबणे वसंतराव घुले, ललित नीळकंठ, आरोग्यसेविका सोनवणे मॅडम, संजय भारती आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला या वेळी गावातील बाहेरगावाहून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विलगीकरनाचे शिक्के मारण्यात आले व सप्त सूचना देण्यात आल्या सर्व आव्हानाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.