जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

उपाशी पोटी सल्ल्याऐवजी रिकाम्या हातांना रोजगार महत्वाचा-मिश्रा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
   समाजात उपाशी पोटी सल्ला देणारे अनेक भेटतील मात्र रिकाम्या हातांना काम देणारे दुर्मिळ असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार विजेत्या महिला नीलिमा मिश्रा यांनी कोपरगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

“आपण आपल्या संस्थेमार्फत उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ०३ हजार महिलांना प्रति माहिना ३० लाख रुपयांचा रोजगार देत असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करत आहे.विशेष म्हणजे आमच्या ज्या संस्थेमार्फत हे कार्य चालते त्यात एकाही महिलेने प्राविण्य मिळवलेले नाही हे विशेष ! आपण जीवनात कायम प्रयोग करत असून त्यातून नेहमी नवनवे शिकत गेलो आहे”-नीलिमा मिश्रा,सामाजिक कार्यकर्त्या,जळगाव.

नीलिमा मिश्रा यांनी जळगाव जिल्हयातील बहादरपूर या गावात महिलांच्या हस्तकला गुणांना वाव देण्यासाठी सुरु केलेले सामाजिक कार्य सर्वदूर पोहचले असून त्यांना सन-२०११ साली त्यांना,’मॅगसेसे’ पुरस्काराने जागतिक स्तरावर पोहचलेले आहे.त्यानंतर भारत सरकारने त्यांना सन-२०१३ साली,’पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे.त्यांनी तेथील महिलांमध्ये एक आगळावेगळा आत्मविश्वास निर्माण केलेला आहे.ग्रामीण महिलांच्या झुंजार वृत्तीचा,उपजत शहाणपणाचा,जिद्दीचा आणि संघटित कष्टांचा सुयोग्य विनियोग केला तर महिला काहीही साध्य करु शकतात हा विश्वास नीलिमा मिश्रा यांनीं दिला असून त्याचे कार्य आता जळगाव,नंदुरबार,धुळे,नाशिक यांच्या बाहेर आता अ.नगर जिल्ह्यात पोहचले आहे.त्यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत शेवया,कुरडया,पापड यासारख्या खाद्यपदार्थांखेरीज शिलाई तंत्र व महिलांचे ड्रेस व अन्य कापडी चीजवस्तू निर्मिती करत असताना व्यवस्थापनाचे धडेही दिले आहे.त्यामुळे त्या महिलांच्या स्फूर्तीस्थान बनल्या असून त्यांचे प्रबोधन कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ओमप्रकाश कोयटे (काका) अध्यक्ष असलेल्या राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अंतर्गत सहकार उद्यमी,जवळके ग्रामपंचायत व जनमंगल ग्रामविकास संस्था आदींच्या संयुक्त विद्यमाने एम.एफ.डी.चे संस्थापक शंकर बोरणारे सर यांच्या मार्गदर्शनात,’मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित केली होती.त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळके ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सारिका विजय थोरात या होत्या.

  

“सरकार उद्योगांना खूप पैसे देते मात्र शेतकऱ्यांना अटी शर्ती घालत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे आत्महत्या वाढल्या असून त्याना प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे.दुष्काळी खेड्यातील शेतकऱ्यांच्या महिलांना उन्हाळ्यात मोकळा वेळ भेटतो त्यात त्यांच्या उपजत बुद्धीचा उपयोग केल्यास रोजगार निर्मिती होती शकते”-नीलिमा मिश्रा,सामाजिक कार्यकर्त्या.

सदर प्रसंगी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे संस्थापक नानासाहेब जवरे,जेष्ठ कार्यकर्ते एस.के.थोरात,एम.एफ.डी.चे संस्थापक शंकर बोरणारे सर,समता सहकारी पतसंस्थेच्या उज्वला बोरावके,आगलावे ताई,माजी सरपंच वसंत थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,बहादराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी पाचोरे,विश्वनाथ थोरात,बाबासाहेब थोरात,संतोष थोरात,दत्तात्रय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,माजी उपसरपंच गोरक्षनाथ थोरात,संतोष थोरात,विजय शिंदे,ग्रामसेवक सतीश दिघे आदी प्रमुख मान्यवरांसह जवळके आणि परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

  

सदर प्रसंगी आपल्या पतीस गमावलेल्या मात्र आयुष्यात मोठ्या हिंमतीने पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या महिला सर्व श्रीमती सीताबाई भाऊसाहेब थोरात,सुनंदा दत्तात्रय थोरात,शिलाबाई शिवाजी थोरात,हिराबाई विश्राम थोरात,मीनाताई बबन थोरात,ताराबाई छगन थोरात,जिजाबाई मारुती थोरात,लिलाबाई बाबुराव थोरात,सरस्वती सोपान थोरात आदी महिलांचा सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र,शाल,नारळ देऊन गौरव करण्यात आला आहे.त्यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते.


त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”वर्तमान सामाजिक स्थिती हि आंदोलने,मोर्चे आदींनी व्यापली गेली आहे.मात्र या विचारांच्या मांदियाळीत सर्वाधिक हाल सोसणाऱ्या महिला,तरुण,विधवा,परित्यक्त्या आदींच्या रोजगाराच्या बाबत कोणी बोलताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.मात्र आपण आपल्या संस्थेमार्फत उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ०३ हजार महिलांना प्रति माहिना ३० लाख रुपयांचा रोजगार देत असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करत आहे.विशेष म्हणजे आमच्या ज्या संस्थेमार्फत हे कार्य चालते त्यात एकाही महिलेने प्राविण्य मिळवलेले नाही हे विशेष ! आपण जीवनात कायम प्रयोग करत असून त्यातून नेहमी नवनवे शिकत गेलो आहे.तेरा वर्षाच्या असताना आपल्या मैत्रिणींना आपण लग्न म्हणजे शिक्षा असे सांगून अस्वस्थ झाल्याचा अनुभव नोंदवला आहे.व त्यातून पुढे जाऊन आपण तेराव्या वर्षी लग्न न करण्याचा निर्णय जाहीर केला होता.त्यावेळी आपल्या मनात,”महिलांना निसर्गाने कोणत्याच बाबतीत गुण कमी दिलेले नसताना त्यांच्या बाबतीत सापत्नपणाचा अनुभव का येतो ? आपल्या जीवनाच्या आपल्याला गरीब श्रीमंती का निर्माण झाली ? ठराविक लोकांना पुढे जाण्याची संधी का मिळते ? आदी प्रश्न सतावत होते.प्रारंभी आपण ‘अर्थव्यवस्था’ हा विषय पदव्युत्तर शिक्षण घेऊन जनतेच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला आहे.गुरूंच्या मार्गदर्शनात त्यातून देशभर ०८ वर्षे भारत भ्रमण केले आहे.त्यातून आपल्याला भारत समजण्यास मदत झाली आहे.त्यातून आपल्या जीवनात काय करायचे याचा निर्णय घेण्यास मदत झाली.देव धर्माऐवजी जीवनातील तथ्य समजण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे सरकारचा अनुदानरूपी पैसा न घेता महिलांना आपण स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची आठवण करून दिली व प्रसिद्धीसाठी काम करायचे नाही असे ठरवले असल्याचे सांगितले आहे.महिलांनी आपल्या क्षमता,गुणवत्ता ओळखल्या पाहिजे.सर्वात महत्वाचे म्हणजे ऐकणे हा गुण आत्मसात केला पाहिजे असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना दिला आहे.बऱ्याच वेळा महिलांचा वेळ दुसऱ्याच्या घरात डोकावण्यात व मैत्रिणीचे उणेदुणे काढण्यात जातो.त्यामुळे त्यांना आपले अस्तित्व समजण्यास अडचण निर्माण होते.सरकार उद्योगांना खूप पैसे देते मात्र शेतकऱ्यांना अटी शर्ती घालत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे आत्महत्या वाढल्या असून त्याना प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे.खेड्यातील शेतकऱ्यांच्या महिलांना उन्हाळ्यात मोकळा वेळ भेटतो त्यात त्यांच्या उपजत बुद्धीचा उपयोग केल्यास रोजगार निर्मिती होती शकते असे सांगितले आहे.
  दरम्यान त्यांनी यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यात कोरोना साथीने आणलेल्या अडचणींचा पाढा वाचला त्यातून विविध संस्थांकडून अडचणीत मदत होईल हि अपेक्षा फोल ठरली असल्याचे सांगून या साथीत आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागला असल्याचे सांगून आपण अडचणीतही प्रकाशाची चंदेरी किनार असते त्याचा शोध घेऊन त्यातून यशस्वी मार्ग काढला असल्याचे सांगून उपस्थित महिलांना थक्क केले आहे.

   त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना आपल्या व्यवसायाच्या महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत.या रोजगरातून आपण हजारो महिलांना रोजगार देत असल्याचे सांगितले आहे.समाजात कोणाकडूनही फुकटची अपेक्षा करू नका.जगात कोणीही फुकटचे काही देत नाही.घेणाऱ्याचा हात खाली असतो तर देणाऱ्याचा वर असतो याची जाणीव करून देऊन तुम्ही या परावलंबित्वातून बाहेर पडण्याचे आवाहन करून या व्यवसायात महिला मोठा सहभाग नोंदवत असल्याचे शेवटी सांगितले आहे.आम्ही यात आमच्या संस्थेचे हित पाहतो त्यातून संस्था आणि महिला यांच्यात समानता येत असल्याचे शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी पत्रकार नानासाहेब जवरे यांनी नीलिमा मिश्रा यांच्या सामाजिक कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली आहे.तर एस.के.थोरात यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले आहे.तर मान्यवरांचे आभार सरपंच सारिका थोरात यांनी मानले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास दत्तात्रय थोरात,बाबासाहेब थोरात,भाऊसाहेब थोरात,संतोष थोरात,विजय शिंदे,ग्रामसेवक सतीश दिघे,वैभव थोरात आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close