दळणवळण
…या हद्दीत रस्त्याचे काम सुरु,ग्रामस्थांत समाधान !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत असलेला मात्र जवळके,अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,शहापूर,बहादराबाद,पोहेगाव,देर्डे कोऱ्हाळे आदी गावांना दळणवळणासाठी महत्वाचा ठरणारा रांजणगाव देशमुख ते देर्डे-कोऱ्हाळे (जुना येवला वाट) रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने त्याच्या खडीकरण कामांचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”काकडी (शिर्डी) विमानतळाच्या आधी संगमनेर तालुक्यातील कासारे येथून सुरु होणारा डांगेवाडी,मनेगाव,रांजणगाव देशमुख देवगाव (ओस पांढरी) पोहेगाव चौकी,देर्डे-कोऱ्हाळे व पुढे कुंभारी हा मोठा सुमारे पन्नास कि.मी.अंतराचा येवल्याला जाण्यासाठी जुन्या काळातील जवळचा मार्ग होता.मात्र कालांतराने नवीन डांबरी मार्ग तयार झाल्याने या मार्गाकडे दुर्लक्ष झाले होते.मात्र त्याचे महत्व कधीच कमी झालेले नाही.त्या रस्त्यावरून दळणवळणासाठी जवळके,अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,शहापूर,बहादराबाद,पोहेगाव,देर्डे कोऱ्हाळे आदी गावांची दळणवळण गरज कधीच कमी झालेली नाही.मात्र प्रस्थापितांनी या कडे कायम दुर्लक्ष केले होते.या मार्गाचे सन-२००४ साली जवळके-बहादरपूर रस्ता ते देवगाव या मार्गावर जवळके ग्रामपंचायतीने तत्कालीन सरपंच वसंत थोरात यांचे काळात रोहयोतून खडीकरण केले होते.त्यानंतर या मार्गावर कधीच आर्थिक तरतूद झाली नव्हती त्यामुळे या भागातील शेतकरी,ग्रामस्थ आदींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.त्यासाठी या भागातील जनमंगल ग्रामविकास संस्थेसह कार्यकर्ते,ग्रामस्थ यांच्या मार्फत कायम लक्ष वेधण्यात येत होते.मात्र त्याला पहिल्यांदा आ.आशुतोष काळे यांनी दाद दिली आहे.व त्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाखांची आर्थिक तरतूद केली आहे.त्याबाबत ग्रामस्थानीं त्यांना धन्यवाद दिले असून समाधान व्यक्त केले आहे.
त्यामुळे त्या कामाचे उदघाटन नुकतेच निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भास्कर थोरात,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव थोरात आदींच्या उपस्थितीत जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांचे हस्ते ठेकेदार विजय कोटकर यांच्या जे.सी.बी.च्या समोर नारळ फोडून सहाय्याने या कामास शुभारंभ केला आहे.
सदर प्रसंगी उपसरपंच सुनील थोरात,चंद्रकांत थोरात,अरुण थोरात,दत्तात्रय नामदेव थोरात,गणेश थोरात,कानिफनाथ थोरात,जालिंदर थोरात,सचिन थोरात आदी उपस्थित होते.