जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बँक ए.टी.एम.फोडले,११ लाखांची लूट,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे ए.टी.एम.अज्ञात दोन चोरट्यांनी दि.२६ मे रोजी रात्री एका जीपच्या सहाय्याने वायर रोप लावून तोडून व ओढून नेले असल्याची घटना ताजी असताना काल अखेर मात्र अज्ञात चोरट्यांनीं आपली मोहीम फत्ते केली असून पोलिसांना पुन्हा एकदा गुंगारा देत कालरात्री ३.४७ वाजता ए.टी.एम.फोडून १० लाख ८३ हजार ७०० रुपयांचा ऐवज कटरच्या सहाय्याने लंपास केला असल्याने कोपरगावसह राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तिन्ही संकल्पित छायाचित्र.

  

दरम्यान सदर पहिल्या गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही.फुटेज उपलब्ध असताना आरोपी सात महिने होऊनही पकडले न गेल्यानेच हा गंभीर गुन्हा घडला असल्याचे बोलले जात आहे.या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणाला जबाबदार धरणार असा ? सवाल निर्माण झाला आहे.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते.राजकीय नेते आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर नेत्यांचा धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.अनेक चोऱ्या होऊनही अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही.रोज होणाऱ्या दुचाकी चोऱ्याची तर मोजदाद नाही.त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे.अशीच मोठी घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२६ मे च्या रात्री घडली होती.तेथे सहकारी सेवा सोसायटीच्या मालकीच्या ‘हिमगिरी’ या इमारतीत इंडियन ओव्हरसिज बँक असून सदर बँक हि ऐन गावाच्या मध्यवर्ती व रस्त्याच्या कडेला आहे.तरीही त्या रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी आपल्या तोंडावर मुखपट्ट्या बांधून ए.टी.एम.फोडता येत नाही हे पाहून आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप या चारचाकीचा वापर करून एका वायर रोपच्या सहाय्याने सदर ए.टी.एम.ओढून बाहेर काढले व त्यास फरफट नेऊन गावाच्या पश्चिमेस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या गोदावरी कालव्याच्या कडेला चौकीजवळ असललेल्या काटवणात लपवून ठेवले होते.त्याला सात महिने उलटत आले असताना त्यांच्या डोक्यातून या बँकेचे ए.टी.एम.बाहेर पडले असल्याचे दिसले नाही.त्यांनी त्यावर पुन्हा एकदा पाळत ठेऊन काल रात्री म्हणजेच दि.१९ डिसेंबरच्या पहाटे ३.४७ वाजता सदर बँकेच्या ए.टी.एम.गाळ्यात प्रवेशकरून तेथील ए.टी.एम.गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील ५००,२००,१०० रुपये दराच्या नोटांची रोख रक्कम रुपये १० लाख ८३ हजार ७०० रुपयांवर डल्ला मारला आहे.त्यामुळे अपुरी असलेली आपली मोहीम पोलिसांच्या नाकावर टिच्चून पूर्ण केली असल्याची जोरदार चर्चा शिर्डी,कोपरगाव आणि राहाता तालुक्यात पसरली आहे.त्यामुळे शिर्डी येथील पोलिसांसमोर या दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

  दरम्यान सदर पहिल्या गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही.फुटेज उपलब्ध असताना आरोपी सात महिने होऊनही पकडले न गेल्यानेच हा गंभीर गुन्हा घडला असल्याचे बोलले जात आहे.या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणाला जबाबदार धरणार असा ? सवाल निर्माण झाला आहे.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

   या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक बच्चू धोंडीराम कोरडे (वय-५२) यांनीं धाव घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.११०७/२०२३ भा.द.वि.कलम ३८०,४५७,३७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचेसह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांचेसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास शिर्डी उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरसाठ हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close