गुन्हे विषयक
कंटेनर-दुचाकी अपघात,दोन ठार,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव पाट येथे नगर-मनमाड महामार्गावर आज सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास राजस्थान येथील कंटेनरने (क्रं.आर.जे.४७ जी.ए.५७२७) दुचाकीला (क्रं.एम.एच.१५ डी.व्ही.९४१४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यात दिगंबर सहादू जेजूरकर (वय-५५) व कडूभाऊ लक्ष्मण क्षिरसागर (वय-४५) असे मयत व्यक्तीचे नावे असून ते दोघे येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील रहिवासी आहे.या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड हा रस्ता नुकताच सावळीविहिर-इंदोर असा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे.तथापि हा रास्ता अरुंद असल्याने या मार्गावर अपघात वाढल असून त्याची प्रचिती आज गुरुवार दि.३१ ऑगष्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजता आली आहे.
सदर घटनेतील दोघे मयत हे वैयक्तिक कामानिमित्त आज दुपारी कोपरगावात आले होते व आपले काम आटोपून ते आपल्या घरी परतत असतांना त्यांच्यावर काळाने हा घाला घातला आहे.ऐन रक्षाबंधनाच्या सणाला हि दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यातील एकच हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर सदर घटनास्थळावरून कंटेनर चालक तत्काळ फरार झाला असून त्या कंटेनरचा क्लिनर याला सुषमा खिलारी व गणेश चव्हाण यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदर कंटेनर हा बंगलोरहुन गुडगाव कडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे.
सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस करत आहे.