जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पिपल्स बँकेचे माजी अध्यक्ष कंगले यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   


कोपरगाव शहरातील व अ.नगर जिल्ह्यातील सहकारातील अग्रणी असलेली कोपरगाव पिपल्स कॉ.ऑप बँकेचे माजी अध्यक्ष व प्रथितयश व्यापारी,कंगले अँड सन्सचे संचालक सुनील दत्तात्रय कंगले (वय-६४)दुपारी ०२ वाजता नगर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सुनील कंगले हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होते.गट काही महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती.त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णलयात उपचार सुरु होते.मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात दुर्दैवाने यश आले नाही.

स्व.सुनील कंगले हे कोपरगाव पीपल्स को-ऑप बँकेचे तीन वेळेस माजी अध्यक्ष व मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक होते.या शिवाय ते कोपरगाव भाजपचे माजी शहराध्यक्ष होते.त्यांचे रोटरी क्लब,व अन्य समाजिक संस्थासह राजकीय क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी ०७ च्या सुमारास कोपरगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

त्यांच्या निधनाने पीपल्स को-ऑप बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांचे सह उपाध्यक्ष,संचालक मंडळ,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी संचालक अतुल काले,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close