आंदोलन
‘त्या’ घटनेचा कोपरगावात निषेध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटनेंचा कोपरगाव येथील मुस्लिम व दलित संघटनांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे.

शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलून गुन्हा दाखल केला होता.हरेगाव येथे बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात उमटले असून कोपरगाव शहरातील मुस्लिम संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.व आरोपीस अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सदर प्रसंगी सलीम पठाण,कोपरगाव आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,साहेबराव कोपरे,विजय त्रिभुवन,राजेंद्र उशिरे,संजय दुशिंग,प्रकाश दुशिंग,संतोष शिंदे,गणेश शिंदे,गणेश पवार,रवींद्र भालेराव,संतोष क कोपरे,गौतम रणशुर,रुषीकेश पवार,भारत सदर,नितीन शिंदे,सचिन शिंदे,रवींद्र धिवर,राहुल खंडीझोड आदिसंह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.