जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत मोटारीच्या तारेची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे गत पंधरवाड्यात एका धार्मिक ग्रंथाची विटंबना झाली असताना व त्यातील आरोपी अद्याप निष्पन्न झाला नसताना आता तेथील शेतकरी काशिनाथ रामचंद्र कोळपे (वय-५०) यांच्या शेतातील विद्युत पंप तोडून त्यातील ०५ हजार रुपये किमतीची १० कि.ग्रॅम.तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोळगाव थडीसह तालुक्यातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत दि.१० ऑगष्ट रोजी रात्री १२ नंतर ते आज सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना नुकतीच उघड झाली होती.त्यामुळे एका गटातील नागरिकांनी गावात एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.त्यानंतर त्यातील आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही व त्यातील आरोपीस अटक केलेली नाही त्यामुळे वातावरण अशांत असताना आता त्याच गावात आणखी एक चोरीची घटना उघड झाली आहे.त्यात एका अज्ञात चोरट्याने तेथील रहिवासी शेतकरी काशिनाथ रामचंद्र कोळपे यांची कोळगाव थडी येथे शेतजमीन असून त्यात एक विहीर आहे.त्यासाठी त्यांनी एक विद्युत पंप बसवला होता.त्यातील तांब्यांची तार कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत अज्ञात चोरट्याने दि.२८ ऑगष्टच्या रात्री कधीतरी दहा कि.ग्रॅम वजनाची व सुमारे ०५ हजार रुपये किमतीची चोरून नेली आहे.

या प्रकरणी फिर्यादी शेतकरी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक फौजदार वांढेकर यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४२१/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जे.एस.वांढेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close