गुन्हे विषयक
अज्ञात महिलेचा मृतदेह,कोपरगाव तालुक्यात खळबळ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारातील गोदावरी नदी पात्रात एक ५०-५५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असून ‘तो’ खून की आत्महत्या यावर वरीसह तालुक्यात चर्वितचर्वण सुरु असून या बाबत कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
दोन्ही छायाचित्रे संकल्पित.
सदर मयत महिलेची उंची साधारण ०५ फूट असून शरीराने सडपातळ आहे.तिच्या डोक्याचे केस काळेपांढरे आहे.चेहरा उभट नाक सरळ,गळ्यात काळ्या गळ्यात काळ्या पाण्याची पोत,नऊवारी पांढऱ्या रंगाची साडी,त्यावर निळे फुले,अंगात पांढऱ्या रंगाचे मळकट ब्लॉउज दोन्ही हातात लाल रंगाच्या बांगड्या,ठिकठिकाणी कातडे निघालेले असून डावा कान जलचर प्राण्यांनी कुर्तडलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात पूर्वमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदीस नुकतेच जलसंपदा विभागाने धरणे भरत असल्याने सुमारे १२ हजार ५० क्युसेसने पाणी सोडले होते.त्यामुळे गोदावरी नदी वाहती झाली होती.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांना वारी येथील खबर देणारे इसम बद्रीनाथ बाळासाहेब जाधव (वय-४४) यांनी खबर दिली की,वारी येथील गोदावरी नदी पात्रात के.टी.वेअर बंधाऱ्याच्या अलीकडे उत्तरेस साधारण २०० मीटर अंतरावर पाण्यात एक अनोळखी स्रि जातीचे प्रेत आढळून आले आहे.तिची उंची साधारण ०५ फूट असून शरीराने सडपातळ आहे.तिच्या डोक्याचे केस काळेपांढरे आहे.चेहरा उभट नाक सरळ,गळ्यात काळ्या गळ्यात काळ्या पाण्याची पोत,नऊवारी पांढऱ्या रंगाची साडी,त्यावर निळे फुले,अंगात पांढऱ्या रंगाचे मळकट ब्लॉउज दोन्ही हातात लाल रंगाच्या बांगड्या,ठिकठिकाणी कातडे निघालेले असून डावा कान जलचर प्राण्यांनी कुर्तडलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह अधिकाऱ्यानी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पूस्तकात नोंदणी क्रं.४८/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिसेल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेन्द्र म्हस्के हे करीत आहेत.