साहित्य व संस्कृती
मुलींना संस्काराची शिदोरी गरजेची-…यांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तरुणांची नवीन पिढी घडवत असताना आता पालकांना त्यांना हिंदू संस्कृतीची संस्काराची शिदोरी गरजेची असल्याने प्रतिपादन हरपित रंधावा यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
तरुण महिलांना नोकरी,व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते.दरवेळी वडील,भाऊ,नवरा सोबत नसतातच.त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते.म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की,स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज आहे.संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची वेळ आली तर तसे करता आले पाहिजे.आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी पाच ते दहा मिनिटे स्वतःचे रक्षण कसे करता येईल यासाठी बॉक्सिंग,कराटे अशा प्रकारचे काही स्वसंरक्षणात्मक धडे घेणे गरजेचे आहे.
आपल्याकडे एखाद्या स्त्रीवर,मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभर पुढील काही दिवस पहायला मिळतात.चौकाचौकांमध्ये निदर्शने होतात,पोलिसांवर दगडफेक केली जाते,कँडल मार्च निघतात.मात्र,जनतेचा हा क्षोभ काही दिवसात शमतो.स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे हे रामबाण उपाय आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.तरुण महिलांना नोकरी,व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते.दरवेळी वडील,भाऊ,नवरा सोबत नसतातच.त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते.म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की,स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज आहे.संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची वेळ आली तर तसे करता आले पाहिजे.आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी पाच ते दहा मिनिटे स्वतःचे रक्षण कसे करता येईल यासाठी बॉक्सिंग,कराटे अशा प्रकारचे काही स्वसंरक्षणात्मक धडे घेणे गरजेचे आहे.ते घेतल्यास सज्जनशक्ती मदतीस येइपर्यंत स्त्रियांना आपला बचाव करता येईल.हे शिक्षण शाळेपासून सुरू केले जावे.यासाठी कोपरगाव नजीक कोकमठाण हद्दीत असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘परवरीश’ या संकल्पनेच्या अनुषंगाने पालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी प्राथमिक,माध्यमिक विभागातील पालक,विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”आपल्या मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होत असताना त्यांना मर्यादेपेक्षा अधिक स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या दृष्टीने घातक आहे.तसंच पालक होण्याची जबाबदारी पार पाडताना लहान मुलं हे घरातील व्यक्तींचे निरीक्षण करत असतात.त्यामुळे आपल्या घरातील आचार विचार सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे.याबरोबरच जगाचे निरीक्षण करून मुलं नवनवीन कौशल्य आत्मसात करत असतात.त्यांच्या भावना आणि नियमित होणाऱ्या बदलांवर त्यांना योग्य असे मार्गदर्शन करणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ही मुलांना योग्य ते मार्गदर्शन अपेक्षित असते.
सदर प्रसंगी कार्यशाळेचे प्रास्ताविक संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे स्वागत समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी केले तर सत्कार कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यशाळेचे सुत्रसंचालन शिक्षिका माही तोलानी आणि चैताली पठारे यांनी केले.उपस्थितांचे आभार शिक्षिका विना खंडूजा यांनी मानले आहे.