जाहिरात-9423439946
सहकार

५० कोटींची जमिन हडपण्याचा डाव शेतकरी संघटनेने उधळला

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील बाजारभावानुसार अशोक सहकारी कारखान्याची सुमारे ५० कोटी रूपये किंमतीची १६ एकर जमिन शैक्षणिक संस्थेच्या नावे करून व भविष्यात खासगी ट्रस्ट द्वारे हडप करण्याचा एका माजी आमदारांचा डाव आहे.शेतकरी,सभासद यांच्या पैशातून उभी राहिलेल्या या जमिनीचा मालकी हक्क कारखान्याकडेच रहावा.त्यासाठी ही जागा शैक्षणिक संस्थेस देणारा प्रस्ताव ना मंजूर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली असून त्याला त्यांनी दुजोरा देऊन तशी तरतुद नसल्याचे कळवल्याने शेतकरी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

शैक्षणिक संस्था ह्या अशोक कारखान्यापासून विभक्त करुन स्वत:च्या मालकीचे खाजगी ट्रस्ट करण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट झाले होते.व सभासदांच्या मालकीच्या संस्था हडप करण्याचा डाव उघड झाल्याने या बाबत शेतकरी संघटनेने युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी आवाज उठवुन वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती त्याला यश आले आहे.

या बाबत दिलेल्या निवेदनात शेतकरी संघटनेने म्हटले आहे की,”अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांने ३० सप्टेंबर २०१९ रोजी अधिमंडळाच्या झालेल्या वार्षिक सभेत ठराव नं.-१४ अन्वये कृषी औद्योगीक शिक्षण,विकास प्रतिष्ठान व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेस शैक्षणिक संकुलासाठी सोळा एकर जमीन ९९ वर्षाच्या कराराने देण्याचा निर्णय घेतला होता.व त्यासाठी मात्र प्रतिवर्ष ०१ रुपया नाममात्र भाडेपट्टा ठरला होता.गेल्या २५ वर्षापासून सदर शैक्षणिक संस्था अशोक कारखाना मालकीच्या अथवा संलग्न असलेने त्यासाठी उस उत्पादकांनी आपल्या उसातून प्रतिटन पैसे दिलेने उभ्या राहिल्या आहेत.कार्यक्षेत्रात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी कोणत्याही सभासद अथवा उस उत्पादकांनी विरोध केलेला नाही. व भविष्यात करणारही नाही.२५ वर्षात कारखाना मालकीच्या जागेत कारखाना संलग्न शैक्षणिक संस्था उभ्या असून सदर संस्थेच्या विकासासाठी जागेची कुठलीही अडचण आजपर्यंत निर्माण झालेली नसताना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सदर शैक्षणिक संस्थेच्या नावावर सोळा एकर जागा देण्याचा निर्णय घेतला होता.व या बाबत सर्व सभासदांना अनभिज्ञ ठेवण्यात आले होते.सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात हा विषय न घेता कोरी जागा सोडून कार्यरोत्तर १४ नंबर ठरावाने मंजूरी घेतलेली होती. कारखान्याच्या बारा हजारहून अधिक सभासदांना विश्वास न घेता केलेली कृती निषेधार्ह असून यावरुन माजी आमदार मुरकुटे यांचा सदर शैक्षणिक संस्था ह्या कारखान्यापासून विभक्त करुन स्वत:च्या मालकीचे खाजगी ट्रस्ट करण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट झाले आहे.व सभासदांच्या मालकीच्या संस्था हडप करण्याचा डाव उघड झाला आहे.याबाबत शेतकरी संघटनेने युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी आवाज उठवुन वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती.व त्या ठरावास मंजूरी न देण्याबाबत महत्वपूर्ण मागणी केली होती.

त्याचबरोबर अशोक कारखान्याने मागील गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात चालू असलेली उस लागवड प्रोत्साहन,बेणे हमी योजना मागील वर्षी २०१९ पासून बंद केली आहे.त्याबाबत काही संचालक व अधिकारी यांचेकडून माहिती घेतली असता त्यांचेकडून १०.९० कोटी रुपये शेतकऱ्यांकडे बेणे हमीचे थकले असल्याचे तोंडी सांगण्यात आले होते.मात्र इतकी मोठी रक्कम शेतकऱ्यांकडे बेणे हमीची थकबाकी असल्याचे संशयास्पद वाटल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी अशोक कारखाना व प्रादेशिक सहसंचालक साखर यांना ०४ ऑगस्ट २०२० रोजी लेखी अर्ज करुन मागणी करण्यात आली होती.परंतु याबाबत कारखाना कार्यकारी संचालक यांनी वारंवार मागणी करुनही यादी देण्यास टाळा-टाळ केली होती.एकुणच नमुद बाबींच्या अनुषंगाने अशोक कारखाना व्यवस्थापनाने बेणे हमी मध्ये ही १०.९० कोटी रुपयांची गैरव्यवहार असल्याचे वाटत असल्याचा दावा केला आहे.तसेच अशोक बँकेने आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना वाटलेले कर्ज थकल्याने सदर थकबाकीतील कर्ज अशोक कारखाना नावे टाकून अशोक बँकेची वसुली करुन घेतलेली असल्याचा आरोप केला आहे.ही बाबही कारखाना उपविधीला छेद देणारी असून त्यामुळे कारखाना तोट्यात गेलेला आहे.तरी अशोक कारखाना मालकीची जमीन कारखाना संलग्न शैक्षणिक संस्थेच्या नावावर करण्यात येऊ नये.या मध्ये माजी आमदार व जेष्ठ संचालक भानुदास मुरकुटे यांना सदर शैक्षणिक संस्था कारखान्यापासून विभक्त करुन खाजगी ट्रस्ट करण्याचा इरादा असून हडप करण्याचा डाव असल्याची माहिती हाती आली आहे.सदर शैक्षणिक संस्था व सोळा एकर जमीन ही आजच्या बाजार भावाप्रमाणे ४९ कोटी रुपयांचा पुढे आहे.त्याचबरोबर बेणेहमी थकबाकी बाबत सखोल चौकशी होऊन शहानिशा व्हावी अशी मागणी या निवदनात करण्यात आली आहे.याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक यांचेशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी ९९ वर्षाच्या कराराने अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेस भाडे पट्ट्याने देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता मात्र त्याला आपल्या कार्यालयाने मंजुरी दिली नसल्याचा खुलासा केल्याने शेतकरी संघटनेने केलेला आरोप खरा ठरल्याचे मानले जात आहे.

या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे,युवराज जगताप,हरिभाऊ तुवर,बाळासाहेब कदम इंद्रभान चोरमल बबन उघडे,नारायण पवार,अहमदभाई शेख,भगवान जाधव यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close