कोपरगाव तालुका
बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना -आ. आशुतोष काळे

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कष्टाची व खऱ्या कमाईची जाणीव होते. एकाचवेळी अनेक शाळेतील विद्यार्थी या बालआनंद मेळाव्यात एकत्र येतात. त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे भोजडे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वारी गटाच्या बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे होत्या.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वारी गटाच्या बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे होत्या.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, माजी सभापती अनुसया होन, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,गटशिक्षणाधिकारी मनोहर दोधाड, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बाराहाते,माजी संचालक दिलीपराव बोरनारे, राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, सरपंच रतनबाई सिनगर, रोहिदास होन, राहुल जगधने, प्रसाद साबळे, आण्णासाहेब जामदार, दत्तात्रय सिनगर, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, लक्ष्मण चौधरी, देवचंद कडेकर, बाळासाहेब जगताप, रावसाहेब टेके, अशोक बोरडे, फारुख शेख, गणेश घाटे, केंद्र प्रमुख दिलीप ढेपले, राजेंद्र ढेपले, किशोर निळे, सौ. मीनाक्षी पेंडभाजे, मुख्याध्यापक चांगदेव ढेपले,आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि,जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाल्या पासून कोपरगाव तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. आवश्यक त्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सातत्याने प्रयत्न करीत आहेत. समाजात ज्याप्रमाणे शिक्षण, व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकासाला देखील तेवढेच महत्व आहे.समोरच्या व्यक्तीला आपल्या विचारांशी सहमत करण्यासाठी विचारांची मांडणी अत्यंत आवश्यक असून विक्री कला, संवाद चातुर्य, सादरीकरण अशा सर्व ज्ञानाची पायाभरणी बाल आनंद मेळाव्यातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाकावू पासून बनविलेल्या टिकावू वस्तू, चित्रकला व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाळा भेट विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख दिलीप ढेपले यांनी केले. स्वागत किशोर निळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कहांडळ जी.जे. व संजय गोरडे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी मनोहर दोधाड यांनी मानले.