कोपरगाव तालुका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुद्दाम भाषण करू दिले नाही-आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देहूत नूकताच शिळा अर्पण करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला असून यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली मात्र प्रोटोकॉल मध्ये संधी असताना त्यांना जाणीवपूर्वक टाळले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी नुकताच कोपरगाव येथे आयोजित निषेध सभेत केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू येथील कार्यक्रमांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी राज शिष्टाचार पाळला न गेल्याचे दिसून आले.या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर अजित पवारांना भाषण न करु देण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे.यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप आणि देहू संस्थानच आमने-सामने आल्याचे दिसून आले असल्याचे दिसून आले आहे.यावर कोपरगाव शहरातही प्रतिक्रिया उमटली असून राष्ट्रवादीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव रेखा जगताप,शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,सेल अध्यक्ष जावेद शेख,रावसाहेब साठे,प्रकाश दुशिंग,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे,सुनील शिलेदार,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,राहुल जगधने,देवेन रोहमारे,शंकरराव चव्हाण,माजी नगरसेवक मंदार पहाडे,फकीर कुरेशी,दिनकर खरे,मायादेवी खरे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,सुंदरराव काळे,प्रल्हाद काळे,राधाकिसन काळे,प्रशांत घुले,सुरेश काळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,देहू संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान उपस्थित होते.राज्याचे व सरकारचे प्रतिनिधी तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.मात्र या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते यांनी भाषण केले त्या नंतर लगेच पंतप्रधानाचे भाषण झाले.मात्र उपमुख्यमंत्री पवार यांना भाषण करू दिले नाही.त्या धार्मिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांचा प्रोटोकॉल विरोधी पक्ष नेत्यापेक्षा मोठा असतांना देखील त्यांना भाषण करू दिले नाही त्याचा निषेध करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी शहराध्यक्ष सुनील गंगूले,शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला आहे.