निवडणूक
शिर्डी वि.का.स.सेवा संस्थेचे नुकसान करणाऱ्यांना पायउतार करा-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे उत्पन्न खूप वाढले असले तरी वीस वर्षांत विकास मात्र दिसत नाही.या संस्थेत गाळ्यांचे उत्पन्न ०३.६० कोटींचे मिळूनही त्याचा फायदा सभासदांना होत असताना दिसत नाही.इमारत भाडे धरून ०४.५० कोटींचे उत्पन्न मिळाले मात्र विकास मात्र केला नाही त्यांनी विविध उत्पन्न देणारे दुकाने बंद करून नुकसान केले आहे म्हणून त्यांना सत्तेतून पाय उतार करणे गरजेचे बनले आहे.जागा खरेदीत बराच घोळ केला असून ती जागा विकासक्षेत्राच्या बाहेर घेतली आहे.त्यामुळे ते भांडवल बुडीत जमा झाल्याने त्यांना येत्या १४मे ला पायउतार करा असे आवाहन साईबाबा संस्थानचे विश्वस्त व काँग्रेस नेते डॉ.एकनाथ गोंदकर यांनी केले आहे.
शिर्डी आणि परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून गणल्या जाणाऱ्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक शनिवार दि.१४ मे रोजी संपन्न होत असून त्यासाठी दोन स्वतंत्र पॅनल रणांगणात उतरले असून त्यातील यशाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘परिवर्तन पॅनल’चा आज ‘बिरोबा बन’ येथे श्री वीरभद्र महाराज यांच्या साक्षीने सकाळी ११ वाजता प्रचाराचा नारळ फुटला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”०१ एप्रिल पासून राज्यात या निवडणुकांचा धूरळा उडण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांना आता तयारीनिशी उतरावे लागणार आहे.त्यातील शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.तीची पंचवार्षिक निवडणूक येत्या १४ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व त्यांना राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून त्यांना दंडाच्या बेटकुळ्या दाखवत वीरभद्र परिवर्तन पॅनेलने अभद्र युतीला टक्कर देण्यासाठी पारंपरिक आ.विखे विरोधक असलेले साईबाबा संस्थानचे विश्वस्त व काँग्रेसचे नेते डॉ.एकनाथ गोंदकर यांची काँग्रेस,शिवसेना,मनसे,रा.स.प.आदींनी रणशिंग फुंकले आहे.त्यांना साथ देण्यासाठी जेष्ठ नेते साई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदींनी आव्हान दिले जात आहे.या शिर्डी विकास संस्थेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आज मोठ्या उत्साहात फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते हरिभाऊ भगत हे होते.
सदर प्रसंगी साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,जेष्ठ नेते साई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,रामराव शेळके,दिलीप कोते,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते, नानासाहेब काटकर,राजेंद्र वाघ,विलास वाघ,रंभाजी बनकर,चांगदेव बनकर,नारायण बनकर,नंदू आबा गोंदकर,भाऊसाहेब कोते,पंडितराव शेळके,भाऊसाहेब शेळके,जगन्नाथ बनकर,अहिलाजी शेळके,राजेंद्र देवराम कोते,उत्तम कोते,गोरक्षनाथ कोते,आप्पासाहेब कोते,बाळासाहेब शेळके,सुभाष कोते,अक्षय राळेकर,सुभाष कोते,गोरक्षनाथ गोंदकर,आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”नवी पिढी आता सज्ञान झाली असून सभासद आता जागृत झाले आहे.त्यांना कोण विकास संस्थेचा कारभार चांगला चालवेल याचा अंदाज आला आहे.त्यामुळे या निवडणुकीत आता सभासदांना कोणी फसवू शकणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.त्यावेळी त्यांनी आपण साईबाबा संस्थानचा कारभार चांगला चालवला कामगारांना कायम करण्यात भूमिका निभावली आहे.मात्र काही नेत्यांनी कर्मचारी सेवा निवृत्त झाले पण कायम केले नसल्याची टीका केली आहे.परिवर्तन पॅनल हा स्वाभिमानी सभासदांचा आहे “दुसऱ्यांच्या ओट्यावर आपला काला खाणाऱ्या”चा नाही.असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.व संस्थेमार्फत निर्माण होणारे गाळे हे सभासदांना प्रथम प्रधान्याने देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.या पूर्वी जेष्ठ नेते अशोक कोते यांनी सत्ताधाऱ्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांनी चार संचालक निवडून आणून दाखवले होते या वेळीही परिवर्तन अटळ असल्याचे शेवटी सांगून त्यांचे चिन्ह हवेतच विरून जाऊ द्या” असे आवाहन करून “कप-बशी”ला मत देण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी केले आहे.
या ‘परिवर्तन पॅनल’चे चिन्ह ‘कपाशी’ आहे.या निवडणुकीत सभासदांनी परिवर्तन पॅनलला बहू संख्येने निवडून द्यावे असे आवाहन साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी दत्तात्रय कोते यांनी,सभासदांना ट्रॅक्टर खरेदी करून ना-नफा,ना-तोटा तत्त्वावर वापरण्यास देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.प्रस्तावित गाळ्यांत सभासदांच्या शेतकऱ्याच्या मुलांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वांसन देण्यात आले आहे.
तर उपस्थितांना मार्गदर्शन जेष्ठ नेते साई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,अशोक नागरे,रामराव शेळके,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते, नानासाहेब काटकर,सौ.लवांडे यांनी केले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन कोते यांनी केले तर उपस्थितांचे आभार अड.संदीप गोंदकर यांनी मानले आहे.