सण-उत्सव
कोपरगांव भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील पाथरवट समाजाचे वतीने सृष्टीचे रचनाकार,देवांचे शिल्पकार,वास्तू शिल्पकारांची देवता “श्री भगवान विश्वकर्मा” यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी सौ.सविता व श्री.महेंद्र टोरपे या उभयतांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले आहे.
भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत.त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली.या नगरांच्या रचनेत,सौंदर्य,अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते.त्यांची जयंती भारतभर उत्साहात संपन्न होते.
भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत.त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली.या नगरांच्या रचनेत,सौंदर्य,अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते.त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान,नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी रामसेतू बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली.त्यात वायुमंडळ,कैलास,वैकुंठ,ब्रम्हपुरी,इंद्रपुरी,स्वर्ग,पृथ्वी,पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली असल्याचे प्राचीन ग्रंथवरून मानले जाते.त्यांची जयंती भारतात उत्साहात साजरी करण्यात येते.कोपरगाव शहरात ती साजरी करण्यात आली आहे.
महिला आघाडी अध्यक्षा राजश्री टोरपे यांनी यु-ट्यूबच्या माध्यमातून विश्वकर्मा पूजा व आरतीचे नियोजन केले.रविंद्र भगत यांनी प्रास्ताविक केले.अध्यक्ष संजय धानके,उपाध्यक्ष कल्पेश टोरपे,प्रताप केने,महेंद्र टोरपे,अक्षीता आमले यांचे समयोचित भाषणे झाली.परशुराम टोरपे यांनी सूत्रसंचलन केले.अनिल आमले,अनिल टोरपे,अनिल भोईर,सागर टोरपे,महेश डोंगरे,हेमंत भोईर,अभय गगे,सुनील गगे,लक्ष्मण आमले आदींच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला अशी माहिती अध्यक्ष संजय धानके यांनी दिली आहे.