सण-उत्सव
शिवरायांसारखे जाणते राजे दुर्मिळ-प्रांताधिकारी
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
कोरोना काळात प्रत्येक नागरिकांनी आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे शिवरायांनी जनतेची खूप काळजी घेतलेली आहे.शिवाजी महाराजांसारखे जानते राजे परत होणे नाही.म्हणून शिवछत्रपती सर्वांचे आदर्श आहेत.असे प्रतिपादन प्रांंताधिकारी गोविंद शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
इ.स.१८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली,जी पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.
माहिती अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिंदे बोलत होते.
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यावेळी म्हणाले कि,” शिवराय हे सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन स्वराज्य व सुराज्य निर्माण करणारे राजे होते.
यावेळी तहसीलदार कुंदन हिरे,तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे,सहा.पोलीस निरीक्षक समाधान पाटील,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार परते,पोस्टमास्तर राजू शेख,गोरक्षनाथ बनकर, बबलू म्हस्के,अमृत मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ गवारे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन शरद तांबे,राजू भालेराव,दीपक म्हसे,बापू भोसले,संजय साठे,सतिश आहेर,अजित ब्राम्हणे,दादा देशमुख,गोकुळ शिंदे,उदय ताराळकर,शंकर रोकडे,पत्रकार कोंडीराम नेहे,प्रदीप भोंडे कुमार बोरुंडे राहुल हुंडेकरी प्रभाकर वाघ,संजय घोगरे,किशोर पारखे,सुरेश ठोके,सचिन माघाडे, बाबासाहेब हारदे,राजू गव्हाणे,आदींनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद तोरणे अनिल बेंद्रे यांनी केले तर आभार धनंजय संसारे यांनी मानले.